शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST

फोटो : हिच ती भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत मूल : शेती व प्लाॅट कामातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील ...

फोटो : हिच ती भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत

मूल : शेती व प्लाॅट कामातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जनता भूमी अभिलेख कार्यालयात येत असतात. जमिनी संबंधी क प्रत, नकाशा, आखीव पत्रिका व विविध दाखल्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात जनतेची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र विविध दाखल्यासाठी पावती भरल्यानंतर वेळेवर दिल्या जात नाही आणि एक महिन्यानंतर पावतीची मुदत संपलेली आहे, त्यामुळे दुसरी पावती भरा असा दम दिला जातो. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शेती व प्लाॅट संबंधी कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनता भूमी अभिलेख कार्यालयात येत असतात. कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करीत अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. भूमी अभिलेख कार्यालयात क प्रत, आखीव पत्रिका, नकाशे व इतर कामासाठी पावती कपात केली जाते. नियमानुसार कागदपत्रे दोन ते तिन दिवसात द्यायला पाहिजे. मात्र ते देण्यास टाळाटाळ केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. आडमार्गाने मात्र त्वरित देण्याचा घाट केला जात आहे. सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा सपाटा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे. शेती संबंधी दररोज शेकडो लोक येत असताना मात्र चिरीमिरी घेऊनच कामे केली जातात उर्वरित लोकांना मात्र या ना कारण पुढे करुन नंतर येण्याचा सल्ला दिला जातो.

बॉक्स

प्रभार सिंदेवाहीतील अधिकाऱ्यांकडे

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांचा कार्यभार सिंदेवाही येथील उपअधीक्षकांकडे असल्याने ते आल्यावरच कागदपत्रासाठी लागणारी पावती कपात केली जाते. त्यानंतर इतर कामे होत असतात. त्यामुळे हे पद भरणे महत्त्वाचे झाले आहे. तशी मागणीही केली जात आहे.

कोट

जनतेची कामे जलद गतीने व्हावी हा आपला प्रयत्न आहे. क प्रत, आखीव पत्रिका, नकाशा व इतर कामासाठी पावती कपात केल्यानंतर काही दिवसातच पुन्हा दुसरी पावती कपात करण्याची सक्ती केली जाते, हे नियमानुसार नाही. याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येणार आहे.

-हरिदास नंन्नावरे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूल.