शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांना वादळाचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:04 IST

तालुक्यातील मिंथूर, नवेगाव पांडव, मिंडाळा, बागल मेंढा, किरमिटी या गावांना मंगळवारी वादळाचा जोरदार फटका बसला. या गावातील शेकडो घरांचे कवेलू व टीन उडाल्याने अनेकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान किरमिटी येथे वीज पडून १४ वर्षीय मुलगा ठार, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. एक बैलजोडीही ठार झाली आहे.

ठळक मुद्देशेकडो घरांची छप्परे उडाली : वीज पडून मुलगा ठार, आई जखमी, बैलजोडीही ठार

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील मिंथूर, नवेगाव पांडव, मिंडाळा, बागल मेंढा, किरमिटी या गावांना मंगळवारी वादळाचा जोरदार फटका बसला. या गावातील शेकडो घरांचे कवेलू व टीन उडाल्याने अनेकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान किरमिटी येथे वीज पडून १४ वर्षीय मुलगा ठार, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. एक बैलजोडीही ठार झाली आहे.तन्मय माधव चौधरी असे मृत मुलाचे नाव आहे. तर कल्पना माधव चौधरी असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिला मृतक मुलाची आई आहे. तन्मय आणि त्याची आई कल्पना हे पावसामुळे गोठ्यातील बैल आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान वीज कोसळली. किरमिटी येथीलच एक बैलजोडीही वीज पडून ठार झाली आहे. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पारडी परिसरात जोरदार वादळ व पाऊस आला. एक तास वादळाचा हा तांडव चालला. पारडी येथील रमेश रघुनाथ कन्नाके हे अंगावर घराची भिंत कोसळल्याने जखमी झाले. या वादळात मिंथूर येथील १०० हून अधिक घरांची पडझड झाली. मिंथूर येथील मुख्य रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने मिंथूर मिंडाळा हा महत्त्वाचा रस्ता बंद झाला. अनेक विद्युत खांबही वाकले आणि खाली पडले. सातही गावातील वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान, नवेगाव पांडव येथील ५० घरांचे नुकसान झाल्याची आहे. पारडी, मिंडाळा, बागल मेंढा, किरमिटी येथे किती घरे पडली, याचा तपशील कळू शकला नाही.