सात वर्षाची बालिका आपल्या घरासमोर अंगणात खेळत असताना येथील अज्ञात इसमाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून गणपती मंदिर गवराळा येथील मागील भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही बालिका पोटात दुखत असल्याने रडत होती. आईवडिलांनी लगेच खासगी रुग्णालयात नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार सुनीलसिंग पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेबाबत पीडित मुलीला विचारणा केली असता ती योग्य ती माहिती देत नसल्याने आरोपीचा शोध घेण्यास अडचण निर्माण होत आहे. अज्ञात आरोपीच्या विरोधात अत्याचार व पाेस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST