शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नमंजुषा स्पर्धेत सात हजार विद्यार्थ्‍यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:35 IST

फोटो बल्लारपूर: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बल्लारपूरच्यावतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत बल्लारपूर तथा बामणी येथील एकूण ३३ विद्यालय आणि ...

फोटो

बल्लारपूर: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बल्लारपूरच्यावतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत बल्लारपूर तथा बामणी येथील एकूण ३३ विद्यालय आणि महाविद्यालयांमधील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्यातील सामान्यज्ञानाची परीक्षा दिली. त्यात विजेत्यांना ५ हजार ५५५, ३ हजार ३३३ व १ हजार १११ रुपये असे बंपर बक्षीस देण्यात आले.

या प्रश्नमंजुषेत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कारकिर्दीत तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास आणि विद्यमान सामाजिक, भौगोलिक यावर ज्ञानात भर टाकणारे प्रश्न विचारण्यात आले होते. स्पर्धा वर्ग ५ ते ८ आणि वर्ग ९ ते १२ अशा दोन गटांकरिता होती. त्यात गटातून प्रथम डॉली रामचंद्र निषाद (वैभव कॉन्व्हेंट, बल्लारपूर), द्वितीय श्रेय रामचंद्र बडकेलवार (दिलासाग्राम कॉन्व्हेंट, बल्लारपूर), तृतीय ऋतुजा विनोद कुडे (गुरूनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर) ‘ब’ गटातून प्रथम टीना रामचंद्र परसुटकर (आयडियल इंग्लिश स्कूल, बल्लारपूर), द्वितीय मोहिनी प्रकाश साळवे (श्री बालाजी हायस्कूल, बामणी), तृतीय साहिल केसकर (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, बल्लारपूर) हे विद्यार्थी विजयी ठरले. बक्षीस वितरण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येथे झाले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष हरिष शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रदेश भाजप महासचिव अजय दुबे, राजू दारी, गुलशन शर्मा आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक व संचालन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व धर्मप्रकाश दुबे यांनी केले. स्पर्धेकरिता मिथिलेश पांडे, आदित्‍य शिंगाडे, प्रतीक बारसागडे, संजय बाजपेई, मोहित डंगोरे, किशोर मोहुर्ले, येलय्या दासरफ, मौला नीषाद, मनीष रामीला, विशाल शर्मा, रींकु गुप्‍ता, गुलशन शर्मा, मनीष मिश्रा, राहुल कावळे, शिवाजी चांदेकर, महेश श्रीरंग, ओम पवार, केतन शिंदे, राहुल बिसेन, सचिन शेंडे, सतीश कनकम, प्रकाश दोतपेल्‍ली, सुधाकर पारधी, अशोक सोनकर, प्रचलित धणरे, अभिषेक सतोकर आदींनी परिश्रम घेतले.