शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

सात धरणे ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: September 27, 2016 00:44 IST

मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून...

जनजीवन विस्कळीत : परतीचा पाऊस थांबता थांबेना चंद्रपूर : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही नद्यांना पूर आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आधार असलेल्या व उन्हाळ्यात ड्राय झालेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून घोडाझरी, डोंगरगाव हे दोन सिंचन प्रकल्प शंभरी गाठण्यावर आले आहेत. गेल्या बुधवारपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत असल्याने आता बस्... पाऊस नको, असे अनेक नागरिक बोलून दाखवित आहेत. या पावसाने भारी धान पिकाला फायदा होत असला तरी इतर पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक पावसामुळे चिंतेत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. पाटबंधारे विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर गेल्या २४ तासात जिल्ह्यात २६.२८ च्या सरासरीने ३९४.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आजपर्यंत १३३३.४६ च्या सरासरीने २०००१.९ मिमी पाऊस झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाने घर कोसळलेबाखर्डी : सततच्या पावसाने घर पडल्याची घटना कोरपना तालुक्यातील निमणी येथे घडली. यात भाऊराव ढावस यांचे मातीचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेजारचे बोबडे व ढवस यांचेही मोठे नुकसान झाले असून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. ब्रह्मपुरी तहसील कार्यालयावर कोसळली वीज ब्रह्मपुरी : सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसात येथील तहसील कार्यालयावर वीज कोसळल्याची घटना घडली. यात संगणक व इतर साहित्य जळाल्याने चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटाने तहसील कार्यालय परिसर हादरून गेला. कार्यालयाजवळील टॉवरवर वीज कोसळल्याने सुरू असलेले तहसील कार्यालयाचे ११ संगणक, इंटरनेट मोडम, प्रिंटर्स, वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले. यात चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती विद्याधर चव्हाण यांनी दिली आहे.