शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

सेवादासनगर शाळेत वर्ग सात गुरुजी एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:16 IST

शाळाबाह्य मुलांची गळती थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना गावातच मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या, परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पहाडावरिल अनेक शाळांमध्ये शिक्षकांची बोंब आहे. याचा फटका विध्यार्थ्यांना बसत आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला. सेवादासनगर शाळेला शिक्षकच मिळाले नाही. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्या यासाठी सेवादासनगरच्या सरपंच विमल किशन राठोड यांच्या शिष्टमंडळासह जि.प. कार्यकारी अधिकारी यांनी भेट घेऊन शाळेची कैफियत मांडली.

ठळक मुद्देसांगा कसे शिकायचे ? : पहाडावर शिक्षणाचा खेळखंडोबा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शाळाबाह्य मुलांची गळती थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना गावातच मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या, परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पहाडावरिल अनेक शाळांमध्ये शिक्षकांची बोंब आहे. याचा फटका विध्यार्थ्यांना बसत आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला. सेवादासनगर शाळेला शिक्षकच मिळाले नाही. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्या यासाठी सेवादासनगरच्या सरपंच विमल किशन राठोड यांच्या शिष्टमंडळासह जि.प. कार्यकारी अधिकारी यांनी भेट घेऊन शाळेची कैफियत मांडली.तेलंगणा-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या सेवादासनगरच्या जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गापर्यंत शाळा आहे. ५६ विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवित आहे. शाळेचे सत्र सुरू होताना नवीन दोन शिक्षक रुजू झाले. त्यापैकी एक शिक्षक आजारी रजेवर गेला. तेव्हापासून तो शाळेत रूजु झालाच नाही. त्यामुळे एकाच शिक्षकाला सात वर्गाचा भार सांभाळण्याची पाळी तर आलीच, परंतु त्यात बिएलओच्या कामाची भर पडली.सकाळी १० वाजतापर्यंत बिएलओचे काम करणे आणि नंतर शाळा उघडणे, असा त्या शिक्षकाचा दिनक्रम आहे. यामुळे गुरुजी असूनही ते विद्यादान करून शकत नसल्याचे चित्र आहे.जिवती तालुक्यावरच अन्याययावर्षी शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या आणि आता ही प्रक्रिया सुध्दा पूर्ण झाली आहे. मात्र जिवती तालुक्यात अजूनही शिक्षक मिळाले नाही. जिवती पंचायत समितीत आधीच ५२ विषय शिक्षकांची पदे रिक्त होती. आता त्यात पुन्हा ४२ शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहे. दोन शिक्षक अतिरिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शाळा आता शिक्षकाविना ओस पडताना दिसत आहे.