शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून रेंगाळलेल्या प्रकरणाचा निपटारा

By admin | Updated: June 26, 2014 23:09 IST

येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने मागील वर्षी शासकीय धान्य पुरवठा योजनेअंतर्गत वाटप साहित्यासाठी १३ हजार रुपयांचा भरणा केला. मात्र वाटपाचे साहित्य मिळाले नाही. तब्बल एक वर्षापासून

गोंडपिपरी : येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने मागील वर्षी शासकीय धान्य पुरवठा योजनेअंतर्गत वाटप साहित्यासाठी १३ हजार रुपयांचा भरणा केला. मात्र वाटपाचे साहित्य मिळाले नाही. तब्बल एक वर्षापासून संबंधित कार्यालयाची पायपीट व पत्रव्यवहाराशिवाय रक्कम परत न मिळण्याची तक्रार उपविभागीय अधिकारी कार्यालयात करताच, वर्षभरापासून रेंगाळलेल्या प्रकरणाचा प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारुन उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांनी केवळ दोन तासातच प्रकरणाचा निपटारा केला व रक्कम परत करण्याच्या शासकीय प्रक्रियेला प्रारंभ झाला.स्थानिक आझाद हिंद चौकामध्ये सरकारी स्वस्त धान्य पुरवठा दुकान आहे. सदर स्वस्त धान्य परवाना संगीता शंकर पाल यांच्या नावे असून त्यांनी मागील वर्षी स्वस्त धान्य सोबतच शासकीय पुरवठा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पामोलियन तेलासाठी रेशनकार्डानुसार १३हजार रुपये पूर्व अमानत रक्कमेचा भरणा केला. मात्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून केवळ स्वस्त धान्य वगळता तेल साठा पुरविण्यात आला नाही. या संदर्भात स्वस्त धान्य परवानाधारक संगीता शंकर पाल यांनी स्थानिक तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा शाखा व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात वारंवार जाऊन तेल पुरवठा संबंधित भरणा केलेल्या रकमेच्या परतीसाठी प्रत्यक्ष भेट व पत्रव्यवहार केला. यातच वर्ष लोटूनही आपली रक्कम शासनाकडून परत न मिळाल्याने अखेर काल येथील उपविभागीय कार्यालयात शंकर पाल यांनी उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांची भेट घेऊन आपबीती सांगितली. यावरुन पराते यांनी नायब तहसीलदार पुरवठा विभाग कर्मचारी यांची कानउघाडणी करुन ताबडतोब जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशीही वार्तालाप करीत रक्कम परतीचे पत्र तयार करुन वर्षभरापासून रेंगाळलेल्या प्रकरणाचा केवळ दोन तासांतच निपटारा केला. शासनाच्या सदोष प्रणालीतही अपवादाने कर्तव्य दक्ष अधिकारी कार्यरत असल्याचा अनुभव या कारवाईतून आला. प्रत्येक अधिकाऱ्याने हे धोरण अवलंबल्यास कामांचा निपटारा होईल, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)