शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:41 IST

शासकीय व अन्य कोणत्याही खासगी यंत्रणेमध्ये ग्राहकांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. नागरिकांच्या हक्काचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या आक्षेपांची सोडवणूक करण्याकडे प्राथमिकतेने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले.

ठळक मुद्देराजेंद्र मिस्कीन : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय व अन्य कोणत्याही खासगी यंत्रणेमध्ये ग्राहकांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. नागरिकांच्या हक्काचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या आक्षेपांची सोडवणूक करण्याकडे प्राथमिकतेने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत बोलत होते. यावेळी अशासकीय सदस्य प्रिती बैतुले, सदाशिव सुकारे, वामन नामपल्लीवार, दत्तात्रय गुंडावार, राजेश कावलकर, समीर बारई, मनिष व्यवहारे, जी. आर. बैस, कल्पना बगुलकर, उमीदया धोटे, संगीता लोखंडे, जगदिश रायगठ्ठा, डॉ. विनोद गोरंटीवार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीमध्ये उपस्थित सदस्यांनी वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून योग्य प्रमाणात सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी नोंदविल्या. काही तक्रारीवर संबंधित विभागाने ताकीद देणारे पत्र काढावे, अशी सुचनाही केली. तहसील कार्यालयामध्ये स्टॅम्पपेपर मिळत नाही, पैशाची अतिरिक्त मागणी केली जाते. त्यामुळे वेंडरची सखोल चौकशी करावी, स्टॅम्पपेपर वितरण करणाºयांनी ग्राहकांना पावती दिली पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्या. रासायनिक पदार्थ, फळ, दुधाची भेसळ व दुधाची साठवणूक याच्यासाठी भरारी पथक नेमावे.मागील काही महिन्यात केलेल्या कारवाईचा अहवाल बैठकीला सादर करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील बससेवेमध्ये वेळा पाळल्या जात नाही. गर्दीच्यावेळी प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अतिरिक्त बस सोडावी, अनेक ठिकाणी थांबा असूनही वाहन पुढे नेल्या जाते. अनेक रस्त्यांवर बसेसची कमरता आहे. बसेस लागणाऱ्या रस्त्यांवर अधिक फेऱ्या कराव्यात, वरिष्ठ अशी सूचना एसटी महामंडळाला करण्यात आली. या सुचनांची दखल घेण्यात आल्याची माहिती मिस्कीन यांनी दिली.सदस्यांनी समस्यांकडे वेधले लक्षरस्त्याचे काम सुरू असताना दुचाकी वाहने चालू शकतील, असे नियोजन व्हावे. बंगाली कॅम्प व अन्य शहरातील अतिक्रमण, विद्युत मंडळाकडून जोडणी देताना आकारला जाणारा अतिरिक्त शुल्क, पीक विमा योजनेतील रक्कम, बीएसएनल कंपनीकडून ब्रॉडबॅन्ड सुरू न होणे, खासगी वाहतूक, आदी समस्यांकडे अशासकीय सदस्यांनी या बैठकीत लक्ष वेधले.