शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेट टॉप बॉक्ससाठी ३१ मार्चची मुदत

By admin | Updated: January 19, 2017 00:44 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाने शहरी तथा ग्रामीण क्षेत्रातील केबल ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेट टॉप बॉक्स लावण्याचे आवाहन केले होते.

मनोरंजन विभागाची माहिती : शहरी भागात लागले ९० टक्के सेट टॉप बॉक्स चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाने शहरी तथा ग्रामीण क्षेत्रातील केबल ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेट टॉप बॉक्स लावण्याचे आवाहन केले होते. मात्र ग्रामीण क्षेत्रासाठी अवधी वाढवून देण्यात आला असून ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स लावण्याची मुभा देण्यात आली आहे. तर शहरी क्षेत्रातील अनेकांच्या टीव्हीवर मुंग्या आल्या होत्या. त्यामुळे यापूर्वीच ९० टक्के ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स लावल्याची माहिती मनोरंजन विभागाने दिली आहे. सेट टॉप बॉक्स लावण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकांना तीन महिन्याची मुदत वाढवून देण्यात आल्याने आणखी काही दिवस त्यांना केबलचा आनंद घेता येणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आॅक्टोंबर महिन्यात सर्व ग्राहकांना सेट टॉप बॉक्स लावण्याचे अनिवार्य करण्यात आले होते. ज्यांनी सेट टॉप बॉक्स लावले नाही, अशांचे केबल प्रसारण बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, या काळात शहरी भागातील जवळपास ९० टक्के ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स लावून घेतले. तर काही जण आजही सेट टॉप बॉक्स लावण्यासाठी उदासिन दिसून येतात. मात्र अशांच्या टीव्हीवर मुंग्या दिसत असल्याने त्यांनाही लवकरच सेट टॉप बॉक्स लावावे लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मनोरंजन विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरी क्षेत्रातील एनलॉग सिस्टम फेस ३ बंद करण्यात आले आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार ग्रामीण क्षेत्रातील एनलॉग सिस्टम फेस ४ सुरूच ठेवण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी डेटलाईन ३१ मार्च करण्यात आली असून आणखी दोन महिने सेट टॉप बॉक्सविना ग्रामीण ग्राहकांना केबलचा आनंद घेता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सेट टॉप बॉक्सवर लूटजिल्ह्यात शहरी तथा ग्रामीण क्षेत्रात यूसीएन, जीटीपीएल, सीटी केबल, वीसीसीए आदी कंपन्यांकडून केबल आॅपरेटरांना सेट टॉप बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र ग्राहकांना सेट टॉप बॉक्स लावून देण्यात मोठी लूट सुरू असून दर वेगवेगळे आकारले जात आहे. काही जण १ हजार रूपयात तर काही जण १५०० ते १८०० रूपयात सेट टॉप बॉक्स लावून देत आहेत. त्यामुळे अनेकांची लूट होत आहे.ग्राहकांसाठी सुविधाएका केबल आॅपरेटने दिलेल्या माहितीनुसार सेट बॉक्स सर्वांकडे उपलब्ध आहेत. ग्राहकांना सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर रक्कम एका वेळी देण्यास अडचण येत असेल तर दोन ते तीन हप्तात रक्कम अदा करण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे. मात्र तरीही काही ग्राहक निरूत्साही असल्याचे सांगितले.