शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नातेवाईक समजून रुग्णांची सेवा करा

By admin | Updated: June 25, 2015 01:24 IST

आरोग्य सेवा ही मोठी सेवा आहे. रुग्णांची हेळसांड होऊ देता कामा नये. रुग्णांना आपले नातेवाईक समजून त्यांची ....

भद्रावती: आरोग्य सेवा ही मोठी सेवा आहे. रुग्णांची हेळसांड होऊ देता कामा नये. रुग्णांना आपले नातेवाईक समजून त्यांची तपासणी करावी व औषधोपचार करावा, असे आवाहन आ. बाळू धानोरकर यांनी डॉक्टर तथा अन्य कर्मचाऱ्यांना केले.भद्रावती- वरोरा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या येथील एका कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व तेथील रुग्णांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी ते अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलत होते. यावेळी स्थानिक बसस्थानकाच्या आवारात बाळू धानोरकरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संपूर्ण स्थानकाची पाहणी करुन येथील समस्यांचा त्वरित निपटारा करण्याच्या सूचना स्थानिक नियंत्रकाला केल्या. या दोन्ही कार्यक्रमात भद्रावतीचे नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, तालुका प्रमुख भास्कर ताजणे, उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर, दिलीप पारखी, नितीन कवासे, मोरेश्वर आवारी, वसंता उमरे, माजी नगराध्यक्ष चंद्रकला आवारी, तालुका संघटिका वैशाली पारखी, नगरसेवक प्रशांत झाडे, प्रमोद गेडाम, संदीप वडाळकर, विनोद वानखेडे, नगरसेविका माधुरी कळमकर, शुभांगी उमरे, रेखा खुटेमाटे, शोभा सातपुते व नालंदा पाझारे, मिनल आत्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.शासनाच्या आरोग्यदायी योजनेत सिकलसेल रोगांचा समावेश करणे, या रुग्णांचा व सोबत असलेल्या एका व्यक्तीला बस भाड्यात सवलत देणे व भद्रावतीच्या रुग्णालयातील असलेल्या ३० खाटा वाढवून त्या ५६ करणे असा प्रस्ताव शासनाला सादर करणार असल्याचे आ. धानोरकरांनी सांगितले. या व्यतिरिक्त भद्रावती बसस्थानकाच्या आवारातील अतिरिक्त जागेत नागरिकांना बसण्याकरिता पाच ते सात खुर्च्या लावण्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले व आरोग्य विषयक समस्या निकालात काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)