चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्यावतीने शेतकरी, पगारदार कर्मचारी, व्यावसायिकांना विविध प्रकारचे कर्ज वाटप केले जाते. त्यांना कमीत कमी वेळेत कर्ज मंजूर होईल, यासाठी बॅंकेच्या पॅनलवर वकील, आर्किटेक्ट, इंजिनियर यांची नेमणूक करण्यात आली. लाभार्थ्यांचे कागदपत्र तयार करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली या सर्वांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी शेतकरी व बॅंकेचे ग्राहकांना कमीत कमी वेळेत कर्ज मिळण्यासाठी तसेच कर्ज मंजूर करताना येणाऱ्या अडीअडचणीबाबत उपस्थितांना माहिती दिली. सर्च रिपोर्ट, मूल्यांकन अहवाल यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी नमुना तयार करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे माहिती घ्यावी, असे सांगितले. यावेळी बॅंकेचे संचालक रवींद्र शिंदे, डाॅ. विजय देवतळे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. विजय मोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी मानले.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST