शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीनुसार कापूस बियाणे निवडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:53 IST

मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देखरीपाची तयारी : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला, माती परीक्षणाचे निष्कर्ष समजून घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्यायचे त्यामध्ये नत्र आणि स्फूरदचे प्रमाण कसे आहे, हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकºयांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.कापूस पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्याची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होईल, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले.खतांचे प्रमाण योग्य ठेवावेकापूस पिकाला रासायनिक खते स्फूरद व पालाश खताची अर्धी मात्रा उगवण झाल्यानंतर नत्रयुक्त खतांची अर्धा मात्रा दिल्यास पीक चांगले वाढते. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकºयांकडून माहिती द्यावी.लागवडीप्रसंगी नत्रयुक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रण करणे आवश्यककोरडवाहू वाण लागवडीपूर्वी शेतातील तणांचे निरीक्षण करावे, रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन सुरुवातीच्या काळातच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.कोरडवाहूचे शेतकरी पूर्णत: पावसावर अवलंबून असतात. पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस कापूस पिकाच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात.उगवणीपूर्वी वापरण्यासाठी तणनाशक अहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड प्रामुख्याने कोरडवाहू लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पन्न व पिकांची कमी वाढ या दोन समस्येने ग्रस्त असते.कोरडवाहू लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाणाची नवीन जात विकसीत केली पाहिजे. कोरडवाहू कापासापासून उत्पादन मिळविण्यासाठी शेतकºयांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कमी पावसाता येऊ शकेल अशाच वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसाचा असावा, जेणेकरुन चांगला पाऊस राहिल्यास त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्चता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.

टॅग्स :cottonकापूस