चंद्रपूर : गुणवंत विद्यार्थी हे समाजासाठी भूषण असून विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्राची निवड करावी व आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून आपला आणि समाजाचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन खैरे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांनी केले. समाजातर्फे मातोश्री सभागृह तुकूम चंद्रपूर येथे मंगळवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्ष पदावरुन बोलत होते.उद्घाटन नागपूरचे पोलीस उपअधीक्षक सुभाष तांगडे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, विजय वाकुलकर, डॉ. आसावरी देवतळे, प्रा. विजय बदखल, डॉ. बी.के.लोणारे, शुभांगी धोटे, वृक्षाली धोटे, प्रा. बैजू सोमलकर, प्रतिभा धोटे, प्रा. सुनील नरांजे, प्रा. सुधाकर पांडव, जे.डी. पोटे, दिनकर ठोंबरे, नामदेव लढी, प्राचार्य मांडवकर, प्राचार्य नथ्यू आरेकर, बंडू भोज, विनोद भोयर, सुनील कोहपरे, सुधाकर बोरकर यांची उपस्थिती होती. उद्घाटनपर भाषणात तांगडे यांनी मार्गदर्शन केले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. विजय बदखल यांनी आय.आय.टी. आणि जेईईची तयारी कशी करावी, याबाबत विस्तृत माहिती दिली. व खैरे कुणबी समाजातील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला बक्षीस देण्याचे जाहीर केले. यावेळी सरिता कुडे, डॉ. आसावरी देवतळे, वृषाली धोटे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष तांगडे, शिक्षक सुनील कोहपरे, आचार्य पदवी प्राप्त प्रा. बैजू सोमलकर यांचा तसेच इयत्ता १० वी व १२ वी मधील ८४ गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन रोहिणी वाकुलकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
आवडीच्या क्षेत्राची निवड करा
By admin | Updated: July 3, 2015 01:26 IST