शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

महापारेषण कंपनीतील सुरक्षा रक्षक सहा महिन्यांपासून वेतनाविना

By admin | Updated: March 30, 2016 01:29 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात सुमारे २०० सुरक्षा रक्षकांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन थकीत ठेवण्यात आले आहे.

 कामगार आयुक्तांना निवेदन : वेतन न दिल्यास भाकपातर्फे आंदोलन भद्रावती : महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात सुमारे २०० सुरक्षा रक्षकांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन थकीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली असून थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपा जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी दिला आहे. चंद्रपूर येथील सहायक कामगार आयुक्त त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे सहा महिन्यापासूनचे वेतन थकीत असून साप्ताहिक रजासुद्धा दिली जात नाही. शासकीय नियमानुसार वेतन स्लिप व पीएफ द्यायला पाहिजे. पण ते सुद्धा दिल्या जात नाही. या सुरक्षा रक्षकामध्ये प्रामुख्याने सुरेश भडके, प्रकाश पेंदोर, नितेश कष्टी, अरुण ढिंगने, विजय देठे, योगेश देठे, प्रशांत नाईक, संतोष गावंडे, नरेंद्र नारशेट्टीवार, अनिल मिलमिले, नितेश मेश्राम आणि विलास दाते यांच्यासह अन्य सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. सुरक्षा रक्षकांनी कामगार आयुक्त, कंपनीचे कार्यकारी अभियंता, आमदार यांना निवेदन दिली. परंतु, त्याची कुणीच दखल घेतली नाही. वेतनाअभावी सुरक्षा रक्षकांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. थकीत वेतन सात दिवसाच्या आत न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राजू गैनवार यांनी दिला असून याबाबतचे निवेदन केंद्रीयमंत्री हंसराज अहीर, राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उर्जामंत्री, कामगार मंत्री, पालकमंत्री यांना देण्यात आले आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)