शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट समितीच्या सचिवांचे मानधन रखडले

By admin | Updated: June 10, 2016 01:15 IST

कृषी विभाग आणि गावकऱ्यांंचा दुवा, अशी ओळख असलेल्या पाणलोट समितीच्या सचिवांना गेल्या १४ महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही.

१४ महिन्यांपासून उपासमार : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी वरोरा : कृषी विभाग आणि गावकऱ्यांंचा दुवा, अशी ओळख असलेल्या पाणलोट समितीच्या सचिवांना गेल्या १४ महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांंवर उपासमारीची वेळ आली आहे.पाणलोट समितीच्या सचिवांना मानधनासाठी आलेला निधी दुसऱ्याच कामात खर्च करण्यात येत असल्याची चर्चा आहे. मानधन मिळाले नसल्याने कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांद्यावर पोहोचवून त्याची अंमलबजावणी करणे, गाव आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय साधण्याचे काम एकात्मिक पाणलोट विकास समितीचे सचिव करतात. वरोरा तालुक्यातील राळेगाव, चारगाव (बु.), वायगाव आणि अर्जूनी या गावात पाणलोट समित्या आहेत. २०११ पासून या चारही गावात पाणलोट समित्यांचे चार सचिव कार्यरत आहेत. सचिवाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना पटवून गावविकास आणि शेतीविकासाचे काम केले जाते. गाव आणि कृषी असा समन्वय साधला जातो. गावात केलेल्या कामाची देखरेख व मोजमापही केले जाते. मात्र हे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या सचिवांना २०१५ पासून १४ महिन्यांचे मानधन देण्यात आले नाही. पाणलोट समितीच्या सचिवांनी आतापर्यंत चारवेळा तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन देण्याची विनंती केली. मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६ मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून सचिवांचे मानधन अदा करावे, अशा आशयाचे पत्र पाठविले. मात्र महिनाभराचा कालावधी लोटूनही सचिवांचे मानधन अदा करण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)