शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टेस्टट्युब बेबी उपचारासाठी रजेची मागणी

By admin | Updated: May 1, 2017 00:46 IST

महिला शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांना वाढते प्रदूषण, धकाधकीचे जीवन व कामातील वाढत्या तणावामुळे मूल न होण्याचे प्रमाण वाढत आहे.

महिला व बालविकास मंत्र्यांना निवेदन : चार वर्षांपासून रखडलेल्या बदल्या कराव्याचंद्रपूर : महिला शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांना वाढते प्रदूषण, धकाधकीचे जीवन व कामातील वाढत्या तणावामुळे मूल न होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम कार्यालयीन कामाच्या क्षमतेवर होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना टेस्टट्युब बेबीसारखे उपचार करावे लागत आहे. या उपचारासाठी अनेक दिवसही लागतात. त्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक व विशेष रजा मंजूर करण्यात यावील अशी मागणी पुरोगामी महिला मंचाने राज्याच्या महिला ब वालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्याच्या ना. पंकजा मुंडे यांना त्यांच्या चंद्रपूर भेटीत शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पुरोगामी महिला मंचाने टेस्टट्युब बेबी उपचाराचा प्रश्न त्यांच्या समक्ष मांडला.समितीने निवेदनात म्हटले की, चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून विविध कारणांनी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या रखडल्या आहेत त्यामुळे अनेक शिक्षक त्रस्थ आहेत, ते ना धड कुटुंबाला न्याय देऊ शकत आहेत ना शाळेला. जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणामुळे बदल्या होतील,असे वाटत नाही, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रखडले आहे, विषय शिक्षक पदोन्नत्या रखडल्या आहेत. रोस्टर अपूर्ण आहे. या परिस्थितीत बदल्या होणे शक्य दिसत नाही. ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी बदल्यांसाठी जिल्हा परिषदेला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. विषय शिक्षक पदस्थापणा करण्यात यावी, समायोजन, प्रमोशन लवकर व्हावे, जिल्हा बदली शिक्षकांना भारमुक्त करण्यात यावे, अवघड क्षेत्र निवडतांना झालेला अन्याय दूर करावा व जिवती संपूर्ण अवघड, बदल्या समूपदेशन पद्धतीने व्हाव्या आदी विविध प्रलंबित मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात पुरोगामीचे विजय भोगेकर, हरीश ससनकर, दीपक वर्हेकर, निखिल तांबोळी, रवी सोयाम, पंकज उद्धरवार, मनोहर आलाम, दुष्यांत मत्ते, शालिनी देशपांडे, जयश्री दीक्षित, ज्योती लहामगे, वैशाली सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)