शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची चंद्रपूर जिल्ह्यात वाघासाठी सर्च मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:41 IST

किन्ही, मुरुमाडी या गावांसह संपूर्ण सिंदेवाही तालुकाच वाघाच्या दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीजवळ एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. आता वनविभागाने वाघाच्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी कॅमरे लावले आहेत.

ठळक मुद्देआतापर्र्यंत तिघांचा बळी सिंदेवाही तालुका वाघाच्या दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: किन्ही, मुरुमाडी या गावांसह संपूर्ण सिंदेवाही तालुकाच वाघाच्या दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीजवळ एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. आता वनविभागाने वाघाच्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी कॅमरे लावले आहेत.सिंदेवाही शहरापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या किन्ही या गावात सायंकाळी उशिरा शेतावरून घरी परतत असलेल्या मुकंदा गोविंद भेंडारे (५२) रा. किन्ही यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वीही निता निकोडे आणि गिता पेंदाम या महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.भेंडारे हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. गोंड, क्षेत्र सहाय्यक अधिकारी आर.एस. लगडे यांनी पंचनामा करून त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित २५ हजार रुपयांची मदत केली. दरम्यान, गुरुवारी वनविभागाच्या वतीने किन्ही परिसरात सर्च मोहीम राबविण्यात येत आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाघाचा शोध सुरू असल्याची माहिती ब्रह्मपुरीचे सहाय्यक वनरक्षक वाकडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. तालुक्यात वारंवार पट्टेदार वाघाचे हल्ले वाढत असल्याने किन्ही-मुरमाडी परिसरातील नागरिक भयभीत आहे. शेतकऱ्यांनी शेतावर जाणे बंद केले आहे.सिंदेवाही तालुक्याला लागूनच बफर झोन असल्याने या परिसरात रोज पट्टेदार वाघांचा संचार सुरू आहे. कित्येक पाळीव जनावरांवरही वाघाने हल्ले केले आहेत. पाण्याच्या शोधात हे हिंस्र प्राणी गावाकडे येत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून जंगलात पाण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Tigerवाघ