शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ कार्यालयावर दुष्काळग्रस्तांची धडक

By admin | Updated: September 24, 2015 01:25 IST

तालुक्यातील मेंडकी परिसरात कमी पाऊस पडल्याने खरीप धान पिकाची रोवणी झालेली नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेती क्षेत्र पडीत आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील मेंडकी परिसरात कमी पाऊस पडल्याने खरीप धान पिकाची रोवणी झालेली नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेती क्षेत्र पडीत आहे. याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुष्काळ निवारण समन्वय समितीच्या वतीने मेंडकी राजस्व मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा बुधवारी ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मेंडकी परिसरातील नागरिक शेती उत्पन्नावर उपजिवीका भागवितात. परिसरातील हजारो शेतकरी व शेतमजूर शेतीवर अवलंबून आहेत. परंतु, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांसमोर उपजिविकेचा मोठा प्रश्न उभा आहे. सरकार कंपन्या वाचविण्यासाठी मोठी आर्थिक मदत करीत आहे. परंतु, शेतकरी दररोज मरत असताना मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. दुष्काळी स्थितीकडे शासनाने जातीने लक्ष घालावे व तातडीने उपाययोजना करावे, यासाठी मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदार अशोक शिवरकर यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात शामराव इरपाते, मोतीराम विधाते, सुधाकर माहाडोरे, जिल्हा परिषद सदस्य भावना इरपाते, मंगला लोनबले, यशवंत आंबोरकर, ज्ञानेश्वर कायरकर, मधुकर करंजेकर, मोरेश्वर हर्षे, केशव आंबोरकर, विनायक पाकमोडे आदी शेतकऱ्यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)