चंद्रपूर : सद्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहेत. नवनवीन संशोधनामुळे मानवाचे जीवन कल्याणककारी बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, विज्ञाननिष्ठ व्हावे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहीन करावे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेअंतर्गत आयोजित विज्ञान शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.देशातील १० ते १७ वयोगटातील मुलांमधील सहज नैसर्गिक कुतूहल शक्तीला व चौकसपणाला वाव देणे, पुस्तकातील विज्ञान व अवतीभवतीच्या परिसरातील विविध घटना यांचा संबंध जोडणे, मुलांच्या शास्त्रीय संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणे तसेच मुलांमध्ये राष्ट्राच्या भविष्यकाळातील गरजांबाबत जागरूकता निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शास्त्रीय वृत्ती असलेले देशाचे भावी नागरिक घडविणे ही उद्दिष्टये समोर ठेवून भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते. सदर परिषदेचे आयोजन हे जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीयस्तरावर करण्यात येते.चंद्रपूर जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे आयोजित करणयत आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानजीभाई चव्हाण हायस्कूलचे प्राचार्य बी.के. रामटेके होते, तर कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविकांत देशपांडे हे होते. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. योगेश्वर दुधपचारे, प्रा. महेंद्र ठाकरे, प्रमोद कोंडलकर, कुंदन मडामे, धनंजय जिराफे यांची उपस्थिती होती.सन २०१३ मध्ये भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर व नेवजाभाई हितकारिणी ब्रह्मपुरी या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली होती. हा प्रकल्प सादर करण्याच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा याप्रसंगी शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरणाचे वेळापत्रक याविषयी सविस्तर माहिती व्हावी याकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आले होते. याकरिता जिल्ह्यातील एकूण ६२ शाळांची व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.या संशोधनपर प्रकल्पाकरिता वयोगट निश्चित केलेले आहेत. लहान गट १० ते १३ वर्षे मोठा गट १४ ते १७ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयारर करून तो १६ आॅगस्टपर्यंत जिल्हा शैक्षणिक समन्वयक धनंजय जिराफे यांचेकडे नोंदवावा व निवडलेला प्रकल्प १७ आॅक्टोबर रोजी सादर करावयाचा आहे. संचालन धनंजय जिराफे यांनी केले तर आभारर कुंदन मडामे यांनी मानले. (प्रतिनिधी)
विज्ञानाची कास धरा, विज्ञाननिष्ठ बना
By admin | Updated: August 9, 2014 23:38 IST