शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

शिक्षकांविना पहाडावरील शाळांवर अवकळा

By admin | Updated: July 2, 2016 01:15 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकता यावे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाने गाव तिथे शाळा दिल्या.

विभागाचे दुर्लक्ष : देवलागुडा शाळेत पाच वर्गांसाठी दोनच शिक्षकशंकर चव्हाण जिवतीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकता यावे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाने गाव तिथे शाळा दिल्या. पण त्या ठिकाणी शिकवायला गुरुजी आहे की नाही, याचा आढावा घेण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत आहे. पहाडावरील अनेक खेडे गावात शाळा असूनही शिक्षकांविना शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. देवलागुडा येथील जिल्हा परिषद शाळा त्याचेच मूर्तीमंत उदाहरण आहे.जिवती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवलागुडा जिल्हा परिषद शाळेला मागील वर्षापासून पाचवा वर्ग जोडण्यात आला. १ ते ५ वर्ग असलेल्या या शाळेत ७७ विद्यार्थी असताना केवळ दोनच शिक्षक येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना वेळेवर डाक देणे, सभेला जाणे, बँकेत जाणे, अशी विविध कामे शिक्षण विभागाने सोपविल्याने दोनपैकी एकच शिक्षक शाळेत असतो. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत मागील वर्षी संबंधित विभागांना नवीन शिक्षकांची नेमणूक करावी, यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. पण गुरुजी काही मिळाले नाही. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. आवश्यक तेवढे विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. मात्र नवीन शिक्षकाच्या नियुक्तीबाबत अद्यापही शिक्षण विभागाच्या हालचाली दिसत नाही. शासन नियमानुसार १ ते ५ वर्गासाठी कमीत कमी चार शिक्षकांची गरज आहे. पण शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे दोनच शिक्षकांना १ ते ५ वर्गाची शैक्षणिक जबाबदारी पार पाडावी लागत आहे. विद्यार्थी संख्येनुसार आणि वर्गानुसार शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा अन्यथा शाळेला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा येथील पालकांनी दिला आहे.शाळेत १ ते ५ वर्ग असून ७७ विद्यार्थीसंख्या आहे. दोनच शिक्षकांना संपूर्ण भार सांभाळावा लागतो. त्यात डाक देणे, मिटींगला जाणे यासह अनेक शैक्षणिक कामासाठी मुख्याध्यापकांनाच जावे लागते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.- एम.एम. पवार, मुख्याध्यापकजि.प.प्रा.शाळा, देवलागुडा