शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

उन्हाळ्याच्या सुटीतही चिमुकल्यांची शाळेत हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:00 IST

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, ना पाटी, ना अभ्यास, ना शाळा, फुल्ल मस्ती. अनेक विद्यार्थी मामाच्या गावाला जाऊ या... म्हणत मनसोक्त आनंद व्यक्त करीत असतात. परंतु, मामाच्या गावाला गेल्यानंतरही शाळेत खंड पडू नये, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येवू नये याकरिता वरोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बोर्डा गावात उन्हाळ्यात सुटीच्या दिवसात शाळा सुरू केली आहे. या शाळेत वाढत्या तापमानातही चिमुकल्यांची मोठ्या संख्येने हजेरी दिसून येत आहे.

ठळक मुद्देवरोरा पं. स. शिक्षण विभाग : विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना धडे

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, ना पाटी, ना अभ्यास, ना शाळा, फुल्ल मस्ती. अनेक विद्यार्थी मामाच्या गावाला जाऊ या... म्हणत मनसोक्त आनंद व्यक्त करीत असतात. परंतु, मामाच्या गावाला गेल्यानंतरही शाळेत खंड पडू नये, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येवू नये याकरिता वरोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बोर्डा गावात उन्हाळ्यात सुटीच्या दिवसात शाळा सुरू केली आहे. या शाळेत वाढत्या तापमानातही चिमुकल्यांची मोठ्या संख्येने हजेरी दिसून येत आहे.उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक मुले अभ्यासापासून स्वत:ला दूर ठेवतात. काही जण हजारो रूपये खर्च करून उन्हाळी प्रशिक्षण शिबिर लावतात तर काही जण विशेष वर्ग लावून स्वत:ला बंधनात टाकून घेत असतात. याला पालकांचीही सहमती असते. परंतु, ग्रामीण भागात या सोयी उपलब्ध नाही. त्यात आर्थिक चणचण; यामुळे ग्रामीण भागातील मुले उन्हाळ्याच्या सुट्यात हिरमुसले होतात.याची दखल घेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने वरोरा शहरानजीकच्या जिल्हा परिषद बोर्डा शाळेत उन्हाळ्यात शाळा सुरू करण्याची संकल्पना मांडली. शाळा सुरू करण्यापूर्वी साधन व्यक्तींनी पालकांच्या भेटी घेवून संकल्पना समजावून सांगितली. पालकांनी याला सहमती दिली. त्यामुळे ही शाळा सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत सुरू असते. या शाळेत कुठलाही धाक, जबरदस्ती, अभ्यास करणे गरजेचे नाही. पाहिजे ती कृती करा, हसत खेळत शिक्षण घ्या, असे आनंददायी वातावरण आहे. त्यामुळे काही विद्यार्थी तबला-पेटीवर ठेकाही धरतात. तर काही विद्यार्थी टाकावू वस्तुपासून टिकावू वस्तू तयार करतात. शिक्षकही प्रेमाने शिकवत असल्याने इयत्ता एक ते सातवी पर्यंत या शाळेत ५० मुलेमुली सहभागी झाले आहेत. घरी पाहुणा म्हणून आलेल्या मुलांनाही या शाळेत प्रवेश दिल्या जातो. विद्यार्थ्यांना आणने व घरी सोडण्याचे कामही शिक्षक सातत्याने करीत आहेत. हसत-खेळत शिक्षण मिळत असल्याने कोणताही विद्यार्थी शाळेला बुट्टी मारत नाही. चार तास शाळेची वेळ केव्हा निघून जाते, हे विद्यार्थ्यांना कळत नाही. इयत्ता कुठलीही असो प्रवेश नि:शुल्क आहे. या उपक्रमाने वरोरा पं. स. शिक्षण विभागाने एक नवीन दिशा दिली आहे.शिक्षक स्वत: करतात खर्चविद्यार्थी उन्हाळ्याच्या शाळेत शिकत असताना लागणारे साहित्य शिक्षक स्वत:च्या खर्चाने विकत आणत असतात. यासाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेतल्या जात नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे. जि. प. शाळा बोर्डा येथील उन्हाळी शाळा वरोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामदास चौधरी यांच्या नेतृत्वात सुरू असून साधन व्यक्ती बाळू जीवने, खुशाल पाचभाई, चंद्रकांत पेटकर, संतोष कोमरेड्डीवार, प्रतिभा हरणे, मनीषा राऊ त कार्यरत आहेत.