शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

अग्निशमन यंत्रणेविनाच धावताहेत स्कूल बसेस

By admin | Updated: June 23, 2014 23:48 IST

परिवहन विभागाकडून स्कुल बस चालविण्यासाठी कठोर नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक स्कुलबस बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत. नियमाना धाब्यावर बसवून राजरोसपणे

चंद्रपूर : परिवहन विभागाकडून स्कुल बस चालविण्यासाठी कठोर नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक स्कुलबस बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत. नियमाना धाब्यावर बसवून राजरोसपणे चालविण्यात येणाऱ्या या स्कुलबसवर कठोर कारवाईची गरज असतानाही परिवहन विभाग दुर्लक्ष करीत आहे. सध्या काही खासगी शाळा सुरु झाल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना स्कुलबसची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.यासाठी पालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. मात्र या स्कुलबसमध्ये विद्यार्थी किती सुरक्षित असतो, याकडे कुणीही लक्ष देत नाही. संस्थाचालक केवळ पैसा जमा करण्यात व्यस्त असतानाच पालकही बसमधील सुविधेकडे दुर्लक्ष करतो. मात्र एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.स्कुलबस चालविताना स्पीड गर्व्हरनरसह अग्निशमन यंत्रणा बसविणे अत्यावश्यक आहे. मात्र या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याची तसदी शाळा व्यवस्थापन दाखवित नाही. एखाद्यावेळी बसला अचानक आग लागल्यास कोणतीही व्यवस्था बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. परिवहन विभागाकडून पॉसिंग करून आणल्यानंतर या स्कुलबसची योग्य देखभाल सुध्दा केल्या जात नाही. बसमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून नेण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसला जाळी लावावी लागते, मात्र अनेक बसला साधी जाळी लावण्यात येत नाही. विद्यार्थ्यांना चढताना आणि उतरताना अपघात होऊ नये यासाठी वाहकाची गरज असते. मात्र शाळा व्यवस्थापन पैसे वाचविण्यासाठी वाहकाची नियुक्ती सुध्दा करीत नाही. त्यामुळे चिमुकल्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:च करावी लागते. यासोबतच बसमध्ये प्रथमोपचार पेटी, विद्यार्थ्यांच्या वयानुसार बैठक व्यवस्था असायला पाहिजे. नर्सरी ते दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना एकच बैठक व्यवस्था असलेल्या बसमधून ने-आण करण्यात येतात. परिवहन विभागाकडून लावण्यात आलेल्या नियमांना तिरांजली देत जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन वाट्टेल तशा स्कुलबस चालवित आहे. त्यामुळे आता पालकांनी जागृत राहून बसमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारणे अत्यावश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)