शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनेगावच्या विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:16 IST

शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही. यासह इतर कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग डाखोरे यांनी मुख्यकार्यपालन अधिकाºयांना तक्रार केली.

ठळक मुद्देशिक्षक शाळेत विद्यार्थी घरी : शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही. यासह इतर कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग डाखोरे यांनी मुख्यकार्यपालन अधिकाºयांना तक्रार केली. पंधरा दिवसानंतरही शिक्षण विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे गावकºयांनी बुधवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद करुन शाळेवर बहिष्कार टाकला आहे.नगर परिषद हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथे जिल्हा परिषदेची १ ते ८ पर्यंत शाळा आहे. या शाळेवर आठ वर्गासाठी सात शिक्षक कार्यरत असून ११४ विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची निर्मिती करण्यात आली. मात्र या शाळेत मुख्याध्यापक म्हणून जी. वाय. मून रुजू झाल्यापासून सन २००९ पासून शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही.देशाचा भावी नागरिक घडावा म्हणून गावा-गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. सोनेगाव (बेगडे) या दीड हजार लोकवस्तीच्या गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ८ पर्यंत शाळा आहे. या शाळेत ११४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून आरटीई कायदा केला. त्यानुसार शाळेवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून जी. वाय. मून रुजू झाल्यापासून मागील अनके वर्षापासून शाळा सुधार फंड व इतर फंडाच्या निधीचा हिशोब शाळा व्यवस्थापन समितीला दिला नाही तर व्यवस्थापन समितीने हिशोब मागितला तर त्यांच्याकडून धमकी देण्यात येते, असा आरोप अध्यक्षाकडून करण्यात आला आहे. तर मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे अध्यापन करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास खुटला आहे. त्यामुळे या वादग्रस्त मुख्याध्यापकांची बदली करत सन २००९ पासून शाळेचे सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पाडूरंग डाखोरे यांनी निवेदनातून केली आहे.निवेदनाला पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही एकाही अधिकाºयांनी शाळेवर भेट दिली नाही. त्यामुळे शिक्षणविभागाच्या लेटलतीफ कारभाराने गावकरी त्रस्त होवून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविने बंद करुन बेमूदत शाळेवर बहिष्कार टाकला. जोपर्यंत सर्व प्रकाराची चौकशी करुन मुख्याध्यापक जि. वाय. मून यांच्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय गावकºयांनी घेतल्याने शिक्षणविभागाची पंचाईत झाली आहे.अन् मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संंवादगावकºयांनी शाळेत विद्यार्थी पाठविने बंद केल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेता डॉ. सतीश वारजुकर यांनी शाळेवर भेट देवून पालकांशी चर्चा करुन थेट मुख्य कार्यपालन अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत गावकºयांच्या समस्यांशी अवगत केले. सात दिवसात शाळेतील सर्व प्रकाराची चौकशी करण्यासंबंधी अधिकाºयांना सांगून शाळा पूर्ववत सुरु करण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जि.प. सदस्य डॉ. वारजुकर यांनी केले आहे.