शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमाती कल्याण समिती ३० पासून चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:56 IST

राज्य शासनाची अनुसूचित जमाती कल्याण समिती ३० आॅगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत सलग तीन जिल्ह्याला शासनाने अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी विविध योजनांमार्फत दिलेल्या निधीचा आढावा घेणार आहे.

ठळक मुद्दे आदिवासी योजनांचा आढावा घेणार आ. अशोक उईके अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : राज्य शासनाची अनुसूचित जमाती कल्याण समिती ३० आॅगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती १ सप्टेंबरपर्यंत सलग तीन जिल्ह्याला शासनाने अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी विविध योजनांमार्फत दिलेल्या निधीचा आढावा घेणार आहे. समितीची चाहूल लागताच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी धास्तावले आहेत.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती यांच्यासमवेत अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना व अडचणींवर अनौपचारिक चर्चा करून आपले मिशन सुरू करणार असल्याची माहिती आहे.यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. प्रा. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती येत आहे. समितीमध्ये ११ विधानसभा व ४ विधान परिषद सदस्य असे १५ आमदार आहेत. तसेच विधान मंडळाचे सुमारे १२ अधिकारी-कर्मचारी सोबत असणार आहेत. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी, नगर परिषदा, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (परिमंडळ), महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महानगर पालिका, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व जिल्हा परिषदेला शासनाने दिलेल्या निधीचा विनियोग कसा झाला यासह चंद्रपूर व चिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत तालुकानिहाय आदिवासी उपयोजनांचाही आढावा घेणार आहे. यानंतर समितीचे सदस्य जिल्ह्यातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

हेडमास्तर घेणार अधिकाऱ्यांचा वर्गसमितीचे अध्यक्ष प्रा. अशोक उईके हे बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहे. त्यांच्या रुपाने आदिवासी समाजातील नवे नेतृत्त्व पुढे आले आहे. ते भाजपच्या वरिष्ठ गटातील असल्याचीही माहिती आहे.यामुळे त्यांना समिती अध्यक्षाचा मान मिळाल्याचे समजते. ते पेशाने हेडमास्तर असून अनुभवी आहे. या समितीच्या कर्तव्याबाबत ते गंभीर असल्यामुळे या दौऱ्यात ते चांगलाच ’क्लास‘ घेण्याची भीती अधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.विधी मंडळाच्या समित्यांचे वरिष्ठ अधिकारी चंद्रपुरात दाखलही समिती आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात चांगलीच झाडाझडती घेण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने विधी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी मंगळवार दि. २८ आॅगस्टलाच चंद्रपुरात दाखल झाले आहेत.

 

टॅग्स :Governmentसरकार