सोई-सुविधांची गरज : पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यास वावसंघरक्षित तावाडे ल्ल जिवतीमहाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावांपैकी शंकरलोधी हे एक गाव. याच गावाला लागूनच महादेव मंदिर व कपीला देवीचे मंदिर आहे. यालाच लागून घनदाट जंगल आहे. पण सुविधा मात्र शुन्य. अनेक भाविक या ठिकाणी येतात. एक पर्यटनस्थळ म्हणूनही या स्थळाकडे पाहिले जाते. या ठिकाणी मोठी नदी असून या नदीत भर उन्हाळ्यात दहा ते बारा फुट निळसर पाणी असते. याच ठिकाणी तीन ते चार कि.मी. अंतर लांबीचा भुयार मार्ग आहे. येथेही नागरिक जात असतात. मात्र विकासाच्या बाबतीत या स्थळाची उपेक्षाच होत आहे.महाराष्ट्र-तेलंगणा राज्यातून अनेक लोक पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणी येतात. याठिकाणी जाताना तेलंगणाचे गावे दिसतात. खुप चांगला परिसर असूनही विकास मात्र झाला नाही.कपीला देवीचे मंदिर अजूनही बांबूच्या झोपडीत आहे, जाण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही. दगडावरुन लोकांना जावे लागते, पाण्याचीही सोय नाही. जायचे असेल तर स्वत:लाच पाणी सोबत घेऊन जावे लागते. अशी भयानक स्थिती याठिकाणी पाहायला मिळते. महादेव मंदिराचीही हीच स्थिती आहे. येथेही जाण्यासाठी रस्ता नाही, विजेचे खांब तारेविनाच उभे आहेत. शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे, पण ते कधी घडले नाही.शासनाने जर ठरविले तर याठिकाणी चांगले पर्यटनस्थळ बनू शकते व तालुक्यात शंकरलोधीची एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी याठिकाणी नेहमी सहल घेऊन जातात. पण खडतर वाटेनेच त्यांना आपला प्रवास पूर्ण करावा लागतो. येथे रस्ताच नाही तर वाहने कुठून जाणार, ही वस्तुस्थिती आहे.
निसर्गरम्य शंकरलोधीतील देवस्थानही शासन दरबारी उपेक्षित
By admin | Updated: April 16, 2015 00:45 IST