शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानातील बोडी खोलीकरण ठरले देखावा

By admin | Updated: June 7, 2017 00:48 IST

शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळे, बंधारे, बोड्या, मामा तलाव व नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरू आहेत.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नियमानुसार काम होत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळे, बंधारे, बोड्या, मामा तलाव व नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरू आहेत. परंतु, नियमानुसार व अंदाजपत्रकानुसार खोलीकरणाचे काम होत नसल्याने तसेच अधिकारी व कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या योजनेचा फ ज्जा उडत असल्याचे चित्र राजुरा तालुक्यात सुरू असलेल्या विविध कामाच्या स्थितीवरून दिसून येत आहे.शासनाने शेतकऱ्यांच्या विकासात्मक बाबींचा विचार करून कृषी, लघु सिंचन, लघु पाटबंधारे, सामाजिक वनीकरण व वनविभागामार्फत कोट्यवधी रूपयांचा आराखडा तयार करून राजुरा उपविभागात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरण, बोडी खोलीकरण, शेततळे, बंधारे बांधकाम यासासारखे अनेक कामे सुरू केले आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भुगर्भातील पाणी पातळी वाढून शेतीचे संरक्षित सिंचन करणे, वाहूण जाणाऱ्या पाण्याला अडविणे, सतत होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करणे व शेतकऱ्यांना संपन्न करण्याच्या उद्देशाने या योजनेची उपयुक्तता आहे. परंतु खोलीकरण कामाच्या अंदाजपत्रकानुसार अडीच ते साडेतीन मिटर खोदकाम करून तेथील माती इतरत्र टाकून खोली वाढविणे व पाळीची उंची वाढविणे असे असताना मात्र पैसा वाचविण्याच्या दृष्टीने फ क्त एक ते दीड मिटर खोदकाम करून अर्धवट सोडून दिले जात ओहत. त्यामुळे अनेक ठिाकणी सुरू असलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे ही फ क्त देखावाच ठरणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन चांगल्या दर्जाची कामे करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. खोलीकरणाच्या कामांची चौकशी करा- राजू डोहेराजुरा तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सिंधी, मुर्ती, नलफ डी, चिंचोली, अहेरी, वरूर रोड या परिसरात कामे सुरू आहेत. ही कामे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे गुणवत्ताहीन राहणार असून कंत्राटदार अंदाजपत्रकातील दिशानिर्देशांना केराची टोपली दाखवित तांत्रिक बाबींचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप राजुरा नगर परिषदेचे नगरसेवक राजु डोहे यांनी केला आहे. परिसरातील कामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्राना पाठविलेल्या निवेदनाद्वारे डोहे यांनी केली आहे.जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत आमच्या शेतातील बोडी खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बोडीत खोदकाम करून माती पाळीवर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु, बोडीतील फ क्त गाळ जमा करून तो पाळीवर सरकविण्यात आला आहे. त्यामुळे खोलीकरण हे एक देखावाच ठरला आहे. याबाबत विचारणा केली असता खोदकाम करून माती टाकून देऊ, असे सांगितले. परंतु, अजूनही काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामे फ क्त देखाव्यापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.-मोरेश्वर थिपे, शेतकरी वरूर रोड