शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

ंअंत्यविधीसाठी लाकडांचा तुटवडा

By admin | Updated: February 17, 2017 00:57 IST

मृत्यू झाल्यानंतर त्या-त्या धर्माच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात.

२० किमीहून पुरवठा : महिनाभरापासून साठा नाही चंद्रपूर : मृत्यू झाल्यानंतर त्या-त्या धर्माच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात. हिंदूत मृत देहाला अग्नि देऊन पंचतत्वात विलीन केले जाते. मात्र, राजुरा परिसरातील मृतांच्या आप्तांना एका नव्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. वनविभागाच्या लाकूड विक्री केंद्रात गत महिनाभरापासून जळाऊ लाकूडच उपलब्ध नाही. त्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी लाकडांचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडून लाकडांची जुळवाजुळव करावी लागत आहे. राजुरा येथे वनविभागात लाकूड विक्री केंद्र आहे. मृतदेह जाळण्यासाठी येथून लाकडे विकत घेतली जातात. यापूर्वी अंत्यविधीकरिता जळाऊ लाकडे मिळाली नाहीत, असा प्रसंग आला नाही. मागील एका महिन्यापासून येथे लाकडांचा साठाच शिल्लक नाही. १३ जानेवारीला सोमनाथपूर वॉर्डातील निवासी कोवे यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी लाकडे आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक वनविभागाच्या विक्री केंद्रात गेले. तेव्हा गत एका महिन्यांपासून लाकूड उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यांना २० किलोमीटर अंतरावरील कळमना बिटातून लाकडे आणावी लागली. आता मंगळवारला तालुक्यातील पंचाळा गावचे निवासी नीलकंठ कोडापे आणि यादवराव चोतले या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठीही विक्री केंद्रात लाकूड मिळाले नाही. जळाऊ लाकडे होती. ती सार्वजनिक स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात विकल्या गेली. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गावागावात भोजनावळी उठल्या. त्यासाठी तेथे जळाऊ लाकडांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असावी, असा अंदाज आहे. लाकडांसाठी स्थानिक नेतेमंडळी दबाव टाकत असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे समजते. वनविभागाच्या आलापल्ली डेपोकडे जळाऊ लाकडांची मागणी मागील एका महिन्यापूर्वी केली आहे, अशी माहिती वनविभाग देत आहे. अद्याप मागणीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे राजुरा परिसरातील मृत व्यक्तीला मरणानंतरही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. यासंदर्भात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गांभीर्याने पावले उचलून लवकरात लवकर लाकडे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)