बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुदधा हे आपल्या कार्यालयात बसले असताना चार जणांनी कार्यालयात घुसून सार्वजनिक शौचालयाची मागणी करीत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. मुदधा यांनी तशी तक्रार बल्लारपूर पोलिसात केली आहे. यावरून प्रिया झामरे, बशीर खान, सतीश कनकम, शबाना बानू या चौघांविरुद्ध बल्लारपूर पोलिसानी जबरीने घुसणे, सरकारी कामात अडथळा आणि दशहत निर्माण करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ करून पालिका कार्यालयात धुडगूस
By admin | Updated: December 23, 2015 01:12 IST