शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी सावित्रीच्या लेकींचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:26 IST

पुरामुळे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची कड खचली आणि रस्ता पुर्णत: पोखरला गेला. तेव्हापासून महामंडळाची एसटी गावात येणे बंद झाले आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. परंतु गावात बस येत नसल्याने सावित्रींच्या लेकींचा दोन महिन्यांपासून पायदळ प्रवास सुरू आहे. रस्ता दुरूस्त करायला सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देरस्ता खचल्याने गावात बस येईना : विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी हाल

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पुरामुळे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची कड खचली आणि रस्ता पुर्णत: पोखरला गेला. तेव्हापासून महामंडळाची एसटी गावात येणे बंद झाले आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. परंतु गावात बस येत नसल्याने सावित्रींच्या लेकींचा दोन महिन्यांपासून पायदळ प्रवास सुरू आहे. रस्ता दुरूस्त करायला सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी केला आहे.गाव तिथे एसटी अशी शासनाची योजना आहे. त्याप्रमाणे गावात एसटी येऊ लागली. मात्र दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरामुळे राजुरा - कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हरदोना खुर्द उपरवाही या मार्गावरील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्याची कड खचली. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने डांबरी रस्ता आतून पूर्णत: पोखरला गेला आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांचा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो, यासाठी हा मार्ग मोठ्या वाहनांसाठी बंद केला असून शासनाची चंदनवाही - मंगी मार्गे उपरवाही आणि हरदोनावरून गडचांदूरला जाणारी एसटी बंद झाली आहे.शिक्षणासाठी या परिसरातील विद्यार्थ्यांना गडचांदूरला जावे लागते. परंतु रस्त्याअभावी बस बंद झाली असून नागरिकांना व विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करीत शिक्षणासाठी जावे लागत आहे.एकीकडे शासनाने रस्ते हॉयटेक करण्याचा संकल्प केला असतानाच राजुरा - कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या उपरवाही - हरदोना खुर्द मार्गाची कड खचली असून आतून रस्ता पोखरला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी हरदोना येथील नागरिक मुर्लीधर, मांडवकर, संतोष बलकी, यादव ठेंगणे, प्रवीण खाटे, कमलेश राजूरकर, महेंद्र बावणे, नरेश राजूरकर, दशरथ ढवस आणि गावकरी व विद्यार्थ्यांनी केली आहे.बांधकाम विभागाला जाग येणार केव्हा ?दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुराने उपरवाही हरदोना खुर्द रस्त्याची कड खचून रस्ता आतून पाण्याच्या प्रवाहाने पोखरला. मात्र दुरूस्ती करण्याचे सौजन्य अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविले नाही.