चंद्रपूर : मकरसंक्रांतीनिमित्त वाणात प्लास्टिक व स्टीलच्या बिनकामाच्या वस्तू वाटण्याच्या परंपरेला फाटा देत मनसे पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप करून नवा आदर्श निर्माण केला. हा उपक्रम चंद्रपूर मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांच्या राजगड या जनसंपर्क कार्यालयात पार पडला.
या वेळी मार्गदर्शन करताना सुनीता गायकवाड म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला सुशिक्षित व्हाव्या, यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांचा जीवनपट हा अत्यंत संघर्षमय असून त्यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. या वेळी मनसे महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष शकुंतला लिपटे, उपाध्यक्ष विमल लांडगे, उपाध्यक्ष शकुंतला रंगारी, उपाध्यक्ष अर्चना वासनिक, उपाध्यक्ष वाणी सदलावार, ॲड. वीणा बोरकर, प्रतीक्षा सिडाम, अध्यक्ष वंदना वाघमारे, विभाग अध्यक्ष मीनाक्षी जीवने, रोशनी आमटे, कुसुम धुळे, रोशनी लांडगे, विमल भटवलकर आदी उपस्थित होते.