शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

वाघ वाचवा जंगल वाचवा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 00:48 IST

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सायकल रॅली शुक्रवारी सकाळी १२ वाजता काढण्यात आली.

चंद्रपूर : संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सायकल रॅली शुक्रवारी सकाळी १२ वाजता काढण्यात आली.सायकल चालक दर्शन झाडे हे नागपूर रेल्वे पोलीसचे जवान असून त्यांना वन्यजीव, जंगल, पर्यावरणाची आवड असल्यामुळे ते या रॅलीत सहभागी झाले. संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेमार्फत ‘वाघ वाचवा जंगल वाचवा’ पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे व डॉ.गोपाल मुंधडा यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी गिरीश बेले, रत्नमाला बावणे, शैलेश जुमडे, शितल इटनकर, राजेंद्र रघाताटे, रवी लोणकर, रोशन टिपले, अंजली घोटेकर, उज्वला येरणे यांची उपस्थिती होती.रॅली चंद्रपूर ते दिल्ली या मार्गाने जाणार आहे. चंद्रपूर, जाम, छिंदवाडा, नरसिंगपूर, सागर, ललीतपूर, झांसी, ग्वालियर, आग्रा, मथुरा या मार्गाने नवी दिल्लीला २६ जानेवारी २०१७ रोजी लाल किल्ल्यावर पोहोचेल. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील वायू प्रदूषण, केमिकल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, प्रदुषणामुळे होणारे आजार व जिल्ह्यातील जंगल कटाई, वाघाचे मृत्यु यावर उपाययोजना करण्याकरिता सायकल चालक दर्शन झाडे व त्यांच्यासोबत असलेले सहकारी पवन खनके, सागर कातकर, कृणाल कामडी हे निवेदन सादर करतील. निवेदन देऊन नवी दिल्ली ते चंद्रपूर तब्बल २६०० किलोमीटर सायकल प्रवास करून झाडे व त्यांचे सहयोगी पवन खनके, सागर कातकर, कृणाल कामडी हे जटपुरा गेट येथे येऊन सायकल रॅलीचा समारोप करतील. (शहर प्रतिनिधी)