शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाचा राजीनामा द्यावा

By admin | Updated: May 31, 2017 01:51 IST

भिसी ग्रा.पं.चे सरपंच अरविंद रेवतकर यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अपात्र घोषीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्क भिसी : भिसी ग्रा.पं.चे सरपंच अरविंद रेवतकर यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अपात्र घोषीत केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यास सदस्य पदावरुन अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे रेवतकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य देवा मुंगले व राजू गभणे यांनी केली आहे. भिसी येथील सरपंच अरविंद रेवतकर यांनी तीन अपत्य असूनही ग्रामपंचायत नामांकन अर्ज दाखल करताना अपत्यासंबंधीच्या दाखल्यावर दोन मुली असल्याचा उल्लेख केला होता. आॅगस्ट २०१५ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अरविंद रेवतकर गटाने १७ पैकी आठ सदस्य निवडून आणले. सत्ता स्थापनेच्या वेळी ठोंबरे गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. सरपंच पदावर रूजू होताच अरविंद रेवतकर यांच्या विरोधात धनराज मुंगले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदविली. सदर तक्रारीसोबत अरविंद रेवकर यांना तीन अपत्य असून तिसरी मुलगी स्वरा उर्फ परी अरविंद रेवकर हिचा जन्म ८ आॅगस्ट २०१४ ला झाला असल्याचे तक्रारीत निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ -१ नुसार चंद्रपूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जानेवारी २०१६ ला अरविंद रेवकर यांना अपात्र घोषित केले. त्यानंतर रेवतकर यांनी उच्चायुक्त कार्यालय नागपूर व त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. याचिकेवर उच्च न्यायालयात सर्व माहितीच्या आधारे अरविंद रेवतकरवर एक लाख पाच हजाराचा दंड ठोठावला. तर चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला. वरील सर्व मुद्यांचा विचार करता सरपंच अरविंद रेवतकर यांनी तात्काळ स्वत:ची नैतिक जबाबदारी समजून कायद्याच्या नियमाचे पालन करीत आपल्या सरपंच पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ग्रापंचायत सदस्य देवा मुगंले व राजू गभणे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून केली आहे.