शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावच्या सरपंचांचे हरियाणातील सरपंचांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

नागभीड : नवेगाव पांडवच्या सरपंच ॲड. शर्मिला रामटेके यांनी हरियाणातील नवनियुक्त महिला सरपंचांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिला ...

नागभीड : नवेगाव पांडवच्या सरपंच ॲड. शर्मिला रामटेके यांनी हरियाणातील नवनियुक्त महिला सरपंचांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिला सरपंचांना येणाऱ्या अडचणींविषयी सखोल उहापोह केला.

मार्था फरेल फाऊंडेशन, दिल्लीद्वारा हरियाणा राज्यातील नवनियुक्त महिला सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकतेच एका ऑनलाईन संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात वर्तमानात कोणत्या अडचणी आल्या आणि भविष्यात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, कोणकोणत्या संकटांना नवनियुक्त सरपंचांना तोंड द्यावे लागते यासारख्या अनेक मुद्द्यांवर या संवाद कार्यशाळेत ॲड. शर्मिला रामटेके यांनी मार्गदर्शन केले.

सरपंच ॲड. रामटेके यांनी सांगितले की, महिला म्हणून प्रत्येक स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, प्रशासकीय, जातीय, राजकीय काम करताना अनेक स्वरूपाच्या अडचणी येतात. पुरुषी सत्ता गाजवणारे व स्त्रियांना कमी लेखणाऱ्यांचा राजकारणात भरणा आहे. अशा मानसिकतेचे लोक कसे विनाकारण स्त्री लोकप्रतिनिधींच्या मागे लागतात व त्यांना त्रास देतात, यावरही विस्तृत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र महिला राजसत्ता आंदोलनाच्या राज्य निमंत्रक मालती सगणे यांनीही या ऑनलाईन कार्यशाळेत नवनिर्वाचित सरपंचांना मार्गदर्शन केले.