शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे आबादी प्लॉट बळकावण्यासाठी सरपंचांनी केला पदाचा गैरवापर

By admin | Updated: September 3, 2015 00:40 IST

शासकीय जागेवर आबादी प्लॉट मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट स्वत: व कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी सरपंच पदाचा गैरवापर ...

वडाळा : शासकीय जागेवर आबादी प्लॉट मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट स्वत: व कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी सरपंच पदाचा गैरवापर केल्याचे प्रकरण दादापूर येथे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्याकडे केली आहे.शेगाव (बु.) जवळ असलेल्या दादापूर येथे सन १९९० ला शासकीय जागेवर आबादी प्लाट काढून गावातील गरजूवंत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. त्याची नोंद ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात घेवून तत्कालीन तहसीलदार यांनी त्या जागेचा ताबा लाभार्थ्यांना दिला. सदर लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम केले. गरिबांनी मात्र अजूनपर्यंत घरे बांधले नाही. त्यामुळे रिकाम्या जागा असल्याची संधी साधून २८ मे २०११ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच छाया लेडांगे यांनी आपल्या मर्जीतील सदस्यांना हाताशी धरून विजय विठ्ठल सोनवाने यांच्या नावे असलेला आबादी प्लाट क्र. ७२ हे स्वत:चे नावे व देवराव बेंडू नन्नावरे यांच्या नावे असलेला आबादी प्लाट क्र. ७५ सरपंच यांचे पती भाऊराव गंगाराम लेडांगे यांच्या नावे करण्याचा ठराव मंजूर केला. त्याला प्लाटधारकाची मंजुरीसुद्धा घेण्यात आली नाही. ग्रामसभेत सुद्धा हा विषय आणून मंजुरी घेण्यात आली नाही. मात्र सदर दोन्ही प्लाट ग्रामपंचायत व तलाठी रेकार्डला परस्पर चढविण्यात आल्याने आदिवासी प्लाटधारक लाभार्थ्यावर अन्याय झाला आहे. मूळ दोन्ही प्लॉटधारकांची नावे कमी करून विजय विठ्ठल सोनवाने यांचे प्लाट क्र. ७२ वर छाया भाऊराव लेडांगे व देवराव बेंडू नन्नावरे यांचे प्लाट क्र. ७५ वर भाऊराव गंगाराम लेडांगे यांची नावे ग्रामपंचायत व तलाठी रेकॉर्डला चढविण्यात आली आणि सरपंच व त्यांचे पती यांनी दोन्ही जागेवर अतिक्रमण करून सदर प्लाटचे पट्टे आमचे नावे करून देण्याबाबत तहसीलदार वरोरा यांचे अर्ज केला. तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला.याबाबत अधिक माहिती घेतली असता, या प्रकरणात उपसरपंच भास्कर जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य अण्णा नन्नावरे यांचा सुद्धा सहभाग असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. हे प्रकरण नियमबाह्य असून आदिवासीवर अन्याय करणारे आहे. त्याचबरोबर स्वत:च्या स्वार्थासाठी आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट बळकावण्याचे प्रयत्नात सरपंच यांनी पदाचा गैरवापर केला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून सरपंचावर कारवाई करण्यासाठी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासकीय अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)