चंद्रपूर : राष्ट्रनिर्मितीत सरदार पटेल यांचे योगदान अविस्मरणीय आहे. स्वतंत्र भारतात सर्व संस्थानांचे विलिनीकरण करून एकसंघ भारत निर्माण करण्याचे कार्य लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांनी केले. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ग्रामीण जनतेसाठी काम केले आहे, ते अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ना. हंसराज अहीर यांनी केले. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. तर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला रमेश मामीडवार, शफीक अहमद, प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दिक्षीत प्रामुख्याने उपस्थित होते.स्व. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशची निर्मिती घडवून आणली. हे योगदान अविस्मरणीय असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले. राष्ट्रसंत व इंदिरा गांधी यांचे पुण्यस्मरण याचदिवशी असल्याने त्यांचेही कार्यक्रमात स्मरण करण्यात आले.शांताराम पोटदुखे यांनी आपल्या मार्गदर्शनात, सरदार पटेलांचा वारसा शिक्षण संस्थेच्या रूपाने जतन केल्याचे सांगितले. सरदार पटेल महाविद्यालय व सरदार पटेल मेमोरिअल सोसायटी या संस्था सरदार पटेलांचे स्मरण कायम ठेवत, असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले. संचालन प्रा. प्रेरणा दहीवडे यांनी केले. कार्यक्रमाला राहुल सराफ, मुरलीमनोहर व्यास, पूनम तिवारी, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सरदार पटेल यांच्या जयंती कार्यक्रमासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)
सरदार पटेलांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अविस्मरणीय : अहीर
By admin | Updated: November 4, 2015 00:52 IST