शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाची पेरणी करणारे संत सेवालाल महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:51 IST

क्रांतिकारी बंजारा समाजात परिवर्तनाचा विचार मांडून जनतेला विधायक कार्याची दिशा देणाºया संत सेवालाल महाराजांच्या विचारांकडे युवापिढी आशावादी नजरेने बघू लागली आहे.

ठळक मुद्देलोकमत दिन विशेष : बंजारा समाजाच्या वतीने जंयतीनिमित्त जिवती येथे आज विविध कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतजिवती : क्रांतिकारी बंजारा समाजात परिवर्तनाचा विचार मांडून जनतेला विधायक कार्याची दिशा देणाºया संत सेवालाल महाराजांच्या विचारांकडे युवापिढी आशावादी नजरेने बघू लागली आहे. याच परिवर्तनाचा प्रवाह आता ग्रामीण भागात पोहोचला. जिवती येथे रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हजारो बंजारा बांधव उत्साहाने सहभागी होणार आहेत.सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ मध्ये बंजारा समाजात झाला. त्या काळापर्यंत जगावर विज्ञानवादी विचारसरणीने राज्य करायला सुरुवात झाली होती. विज्ञानवादी विचारसरणीने नवीन शोध लावून जग संपर्कात येवू लागले. नवीन शोध लागल्याने जगात विज्ञानाचे महत्त्व पटायला लागले होते. ज्यावेळी विज्ञानाचे महत्त्व साºया जगाला पटत होते. त्यावेळी दैवी अवतार आदी काल्पनिक बाबींला काही स्थान उरले नव्हते.इ.स. १८ व्या शतकापर्यंत भारतात लक्षणीय सामाजिक सुधारणा झाली होती. तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, सम्राट राजाभोग, मुघल बादशहा अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रती संभाजी असे थोर राजे होवून गेले होते. त्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर साम्राज्य स्थापण केले होते. सेवा व कार्य आणि विज्ञानवादी विचाराला पुढे आणले होते. जगाला समतेचा संदेश दिला होता. दैवी, चमत्कारी अवतार आदी गोष्टी टाळून कर्तृत्व व विचाराने सर्व जगावर राज्य करता येते. हे या थोर महान नेत्यांचा इतिहास वाचल्यावर लक्षात येते. पृथ्वीतलावर ज्या लोकांनी आपले साम्राज्य स्थापन केले ते सर्व मानव होते. ते कोणीही देव, देवता किंवा दैवी अवतार नव्हते. हाच वैचारिक वारसा संत सेवालाल यांनी बंजारा समाजासमोर मांडला आहे.बंजारा समाजाचा सखोल इतिहास अद्याप लिहिण्यात आला नाही. परंतु बंजारा बांधवाद्वारे मौखिक भजन, कीर्तन कथा व लोकगीतांद्वारे प्रबोधनाचा प्रवाह सतत वाहत असल्याची उदाहरणे इतिहासातून दिसून येतात. १८ व्या शतकात भारतात बंजारा समाजात क्रांतीकारी सेवालाल महाराजांचा जन्म झाला. सद्य:स्थितीला बंजारा समाजात काही मंडळी असे सांगतात की, ते दैवताचे अवतार होते. त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून देवीची पूजा केली. खूप चमत्कारी बाबी केल्या. स्वर्ग-नरक अशा संकल्पना तयार केल्या. शेवटी त्या देवीने त्यांना स्वर्गात नेले. खरे तर या दंतकथा चुकीच्या आहेत. अंधश्रद्धेत वाढ करणाºया आहेत. सेवालाल महाराजांनी अशा खुळचट गोष्टींना कधीही स्थान दिले नाही, असा इतिहास सांगतो. बंजार समाज अंधश्रद्धेच्या खाईत जाण्याचे हे प्रमूख कारण आहे. क्रांतीकारी सेवालाल महाराजाने समाज, देशाला उद्देशून सांगितले गेलेले विचार आजही पे्ररणादायी आहेत. ‘ जाणजो, छानजो, पचा मानजो (कोणतीही बाब माहिती करून घ्या, शिकून घ्या, त्यास पडताळून पाहा नंतरच त्याचा अवलंब करा) आयेवाळे काळेम रपिया कटोरो पाणी वकिये (येणाºया काळात रूपियाला तांबाभर पाणी मिळेल) केणी भजो मत, पुजो मत, बालबचियान शिकावो शाळा’ (कोणाला भजु नका, पुजु नका, मुलांना शाळा शिकवा) असा मौलिक संदेश संत सेवालाल महाराजांनी दिला आहे. सेवालाल महाराज हे काल्पनिक बाबीवर विश्वास ठेवणारे नव्हते. सत्य परिस्थिती पाहून बोलणारे होते. चारशे वर्षांआधी निसर्ग व मानवाच्या हालचाली पाहून पाण्याच्या समस्याबद्दल लोकांना मार्गदर्शन केले. रुपियाला तांब्याभर पाणी मिळेल, असे सांगितले होते. ते आजही सत्य आहे. विज्ञानाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. मुलांना शाळा शिकवाख असा संदेश देण्यात सेवालाल महाराज अग्रस्थानी होते. सर्व समाज एकत्र यावा, याकरिता महाराज पूर्ण देशभर ेदौरा करून लोकांना मार्गदर्शन करीत होते. विज्ञान व सत्याचे महत्त्व लोकांना पटवून देत होते. बंजारा समाज हा निसर्गपूजक आहे. पण, आज काही तांड्यात जावून पाहणी केल्यास अंधश्रद्धा वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे बदलत्या काळानुसार ज्ञान व विज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी युवापिढी विविध कार्यक्रमांद्वारे परिवर्तनपर कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे,अशी माहिती अभ्यासक राहुल पालतिया यांनी दिली.