गोंडपिंपरी : करंजी गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून करंजी गावासह गोंडपिंपरी तालुक्यातील नागरिकांना अच्छे दिन आणून दाखवू, अशी ग्वाही क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी दिली.करंंजी येथील आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. राजुरा विधानसभेतील गोंंडपिंपरी तालुक्याला क्षेत्राचे लोकप्रतिनिधी सावत्र वागणूक देतात, अशी गोंडपिंपरीवासीेयांची नेहमीचीच ओरड आहे. ती थांबविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही अॅड. धोटे म्हणाले.दरम्यान, करंजी येथील बसस्थानकावरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोरील आणि चलाख ते पेंढारकर, पाण्याचीे टाकी ते जुबेर यांच्या घरापर्यंतच्या रोडचे भूमिपूजन करण्यात आले. करंजी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून ज्योती अशोक चिचघरे स्थानापन्न झाल्यापासून विकास कामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. परिणामी गावकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे. याप्रसंगी सरपंच ज्योती चिचघरे, भाजपा जिल्हा महासचिव बबन निकोडे, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक उल्हास करपे, उपसरपंच सिंधू गावंडे, अशोक चिचघरे, राकेश मून उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
करंजी गावच्या विकासासाठी कटिबद्ध - संजय धोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:07 IST