शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

संजय डोर्लीकर राष्ट्रीय सन्मानाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:16 IST

राष्ट्रीय शैक्षणिक योजना तथा प्रशासन संस्था, नवी दिल्लीतर्फे संपूर्ण देशभरातून उत्कृष्ट शैक्षणिक व प्रशासकीय कार्य करणाऱ्या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीय सन्मान देऊन गौरव करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी करुन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. या कार्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना सन २०१७-१८ चा राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय शैक्षणिक योजना तथा प्रशासन संस्था, नवी दिल्लीतर्फे संपूर्ण देशभरातून उत्कृष्ट शैक्षणिक व प्रशासकीय कार्य करणाऱ्या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीय सन्मान देऊन गौरव करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी करुन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. या कार्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना सन २०१७-१८ चा राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आला.जिल्ह्यातील माध्यमिक शाळा नोव्हेंबर २०१७ मध्येच शंभर टक्के डिजीटल झाल्या. या कार्यात तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, तत्कालीन उपसंचालक अनिल पारधी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळाले. या कार्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यात बरेच विद्यार्थी शाळाबाहय असल्याचे निदर्शनास आले. याचा शोध घेण्यासाठी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी एक नवीन उपक्रम सुरु केला. प्रत्येक शाळेत शाळाबाहय विद्यार्थी दाखवा व मुख्याध्यापक यांच्याकडून एक हजार रुपये मिळवा, अशा प्रकारचे फलक लावण्यात आले. त्यामुळे शाळाबाहय मुलांची संख्या कमी झाली.या विधायक कार्याबद्दल शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना शुक्रवारी निपा नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावळेकर तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळयात देशभरातून ४९ अधिकाºयांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून शिक्षणाधिकारी (मा.) संजय डोर्लीकर यांचा समावेश होता.येन्सा येथील अंगणवाडीला पुरस्कारकेंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते वरोरा तालुक्यातील येन्सा येथील अंगणवाडी सेविका अंजली बोरेकर यांना राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील प्रवासी भारतीय भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव उपस्थित होते. अंगणवाडी सेविका बोरेकर यांनी विविध जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले.