वरोरा : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात चंदनाची झाडे लागवडीकरीता उपलब्ध होणार असुन चंदन झाडाचे उत्तम संगोपन केल्यास लावणाऱ्या व्यक्तीस काही वर्षांनी मोठा याचा आर्थिक लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यात भात, कापूस, सोयाबीन पिके घेतली जाते. ही पिके घेत असताना निसर्गावर अवलंबूनन राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षोनीवर्ष आर्थीक तोटा सहन करावा लागतो. याकरीता शेतात व घराच्या अंगणात चंदनाची झाडे लावण्याकरीता वरोरा शहरातील श्री साई बहुउद्देशीय संस्थेचे किशोर उत्तरवार, स्वप्नील देवाळकर, रितेश नौकरकर, सुनील कोल्हे यांनी पुढाकार घेतला आदी चंदनाचे झाड नैसर्गीक दृष्ट्या समृद्ध व पर्यावरणास पुरक आहे. चंदनाचे झाड १० ते १५ वर्षाच्या दरम्यान उत्पन्न देण्यास तयार होते. कडुलिंबाप्रमाणे चंदनाचे झाड आॅक्सीजनपुरक असुन परोपजीवी असल्याने लागवड करताना पुरेशी काळजी घ्यावी लागते. चंदनाच्या झाडाचे संगोपन केल्यास दहा ते १५ वर्षाच्या कालावधीमध्ये संगोपन करणाऱ्या व्यक्तीस मोठा आर्थिक लाभ होईल असे मानले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरोरा परिसरात चंदनाची झाडे लावणार
By admin | Updated: June 15, 2015 01:07 IST