शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

बाजारात सामसूम, मात्र रस्त्यावर धामधूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बाधितांच्या मृत्यूची संख्याही धडकी भरविण्यापर्यंत पोहोचली. कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या वाढविण्यात आल्या. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोना कहर सुरू झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनही हादरले. दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अंमबलबजावणी यंत्रणेला सूचना दिल्या.

ठळक मुद्दे‘ब्रेक द चेन'ला व्यापाऱ्यांचा विरोध : जिल्ह्याची आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने मंगळवारपासून लॉकडाऊन नव्हे, तर ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध लागू केले. बुधवारी दुसऱ्या दिवशी केवळ मेडिकल स्टोअर्स व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. त्यामुळे बाजारात सामसूम, तर रस्त्यांवर धामधूम असल्याचे चित्र दिसून आले. महिनाभर हेच चित्र कायम राहिल्यास आर्थिक घडी पुन्हा खिळखिळी होण्याची धास्ती व्यापारी व सर्वसामान्यांच्या मनात आहे.कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बाधितांच्या मृत्यूची संख्याही धडकी भरविण्यापर्यंत पोहोचली. कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या वाढविण्यात आल्या. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोना कहर सुरू झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनही हादरले. दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अंमबलबजावणी यंत्रणेला सूचना दिल्या. त्यामुळे किराणा, मेडिकल, जीवनाश्यक वस्तू व सेवांचा अपवाद वगळता सर्वच दुकाने बंद कराव्या लागल्या. बुधवारी दुसऱ्या दिवशीही चंद्रपूर शहरातील वर्दळीचा गोलबाजार बंद होता. मात्र, सार्वजनिक वाहतूक व ऑटो सुरू असल्याने रस्त्यावर धामधूम दिसून आली.

वरोरा, राजुरात शुकशुकाटवरोरात किराणा व मेडिकल स्टोअर्स वगळता सर्वच दुकाने आज दिवसभर बंद होते. त्यामुळे बाजारात शुकशुकाट दिसून आला. नगर परिषद पथक व पोलिसांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. राजुरातील व्यापाºयांनीही निर्बंधाचा आज विरोध केला.

  व्यावसायिकांचे शुक्रवारच्या निर्णयाकडे लक्ष‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दुकानांवर निर्बंध लागू केल्याने राज्यातील व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने मंगळवारी व्यापारी संघटनांची ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये चंद्रपूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारीही सहभागी होते. राज्य सरकारने महाराष्ट्र चेंबरशी चर्चा करून निर्बंध आदेशात सुधारणा करावी, अन्यथा शुक्रवारपासून दुकाने सुरू करू असा इशारा देण्यात आला. त्यामुळे शुक्रवारच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत चंद्रपुरातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत.

 चंद्रपुरातील भाजी बाजारात आवक घटलीचंद्रपुरातील मुख्य भाजी बाजारात दररोज शेकडो टन मालाची आवक होते. शासनाने भाजीबाजार व वाहतुकीला निर्बंध घातला नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी माल उचलला नाही तर फटका बसेल या धास्तीने चंद्रपुरात भाजीपालाच आणला नाही. हा प्रकार असाच सुरू राहिला तर भाजीपाल्याची टंचाई निर्माण होऊ शकते.

  असंघटित मजुरांचे हालहातावर पोट असलेले असंघटित क्षेत्रातील कंत्राटी, कामगार, मजूर नाभिक, प्लंबर, भेळ-समोसा-वडा वगैरे रस्त्यावर, रेल्वे स्थानक व बसस्थानकावर विकणारे, फुलवाले, हमाल, मॉल, दुकानातील कामगार अनेक स्वयंरोजगार व मजुरी करणारे कामगार अडचणीत आले         आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या