शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मुलगा झाला विक्रीकर अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:07 IST

शिक्षण घेत असतानाच घरच्या शेतीकामात मदत करून शिक्षणाची जिद्द सोडली नाही. लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने विनोद विदुम भोयर या भूमिपुत्राने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून मुलगा विक्रीकर अधिकारीपदासाठी पात्र ठरला़

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शिक्षण घेत असतानाच घरच्या शेतीकामात मदत करून शिक्षणाची जिद्द सोडली नाही. लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने विनोद विदुम भोयर या भूमिपुत्राने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून मुलगा विक्रीकर अधिकारीपदासाठी पात्र ठरला़वरोरा तालुक्यातील आबवडगाव येथील विनोद भोयर याने वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर साखरा येथील किसान विद्यालयातून दहावी झाला़ या कालखंडात विनोदला वडगाव ते साखरा येथून पायी जावे लागत होते़ १२ वीपर्यंतचे शिक्षण बोथली येथील भिवाजी वरभे कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केल़ दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. पदवी घेत असताना ग्रामीण भागात राहूनच स्पर्धा परिक्षेची तयारी ुसुरू केली़ वडगावसारख्या ठिकाणी ग्रंथालयाची सुविधा नाही़ स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन मिळणे कठीणच होते़ अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये विनोदने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. वडील व भाऊ शेती करतात. भोयर कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण कुटुंब शेतात राबते़ विनोदने शेतीला हातभार लावून अभ्यासाला नियमित वेळ देत होता़ परिस्थिती नसताना त्याने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गाव व परिस्थिती कशीही असो़ मनात खुणगाठ बांधल्यास यश संपादन करता येते, हे विनोद भोयर या तरुणाने दाखवून दिले आहे. विनोदन केवळ भाषा विषयाची खासगी शिकवणी लावली होती़ आईवडील, भाऊ, शिक्षक, मित्रांना मार्गदर्शन केल्याने यश मिळाले़ यापुढे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न मनात ठेवून विनोदने तयारी सुरू केली आहे.