शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ंब्रह्मपुरी तालुक्यात खताच्या नावावर मातीची विक्री

By admin | Updated: August 19, 2015 01:28 IST

एक वर्षापूर्वी तालुक्यातील चांदली, कालता, नान्होरी, बेलगाव, चांदगाव, बोरगाव, बेलदारी यासह अनेक गावामध्ये बोगस खत कंपनी ...

प्रकरण थंडबस्त्यात : ब्रह्मपुरी पोलिसांची कामगिरी संशयाच्या भोवऱ्यातब्रह्मपुरी : एक वर्षापूर्वी तालुक्यातील चांदली, कालता, नान्होरी, बेलगाव, चांदगाव, बोरगाव, बेलदारी यासह अनेक गावामध्ये बोगस खत कंपनी व त्यांच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांना खताच्या नावावर मातीची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. यामुळे हजारो शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवर पंचायत समिती व कृषी विभागाद्वारे सखोल चौकशी होऊन चौकशीअंती ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात १३ डिसेंबर २०१३ ला गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींना केवळ सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. आता केवळ कागदी घोडे नाचविणे सुरू आहे.याच प्रकरणातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व न्याय मिळावा म्हणून आमदार नाना श्यामकुळे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विशेष म्हणजे आयुक्तालयातून देखील आरोपीविरुद्ध कारवाई व नुकसान भरपाईबाबतचे आदेश देण्यात आले होते.एरव्ही सामान्य माणसावर गुन्ह्याची नोंद होताच त्याला तात्काळ अटक करण्यात येते. याही प्रकरणात हीच अपेक्षा होती. पोलिसांनी तक्रारीत नमूद आरोपींना अटक करण्यासाठी २२ सप्टेंबर २०१४ ला अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पथक पाठविले. या पथकाने अमरावती, भिवापूर व ब्रह्मपुरी येथून सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांचे बयाण नोंदविले. त्याबाबतची सविस्तर नोंद स्टेशन डायरीत घेण्यात आली. त्यानंतर त्यांना सुचनापत्र देऊन २४ सप्टेंबर सोडून देण्यात आले. ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यात शशीकांत प्रभाकर लाकडे रा. अमरावती, माधव प्रभाकर निमकर किरसा (जि. अमरावती) अशोक पंजाबराव दहीकर गाडगेनगर अमरावती तसेच महेश उर्फ राहूल हरडे यास भिवापूरवरुन तर गिरीश पांडुरंग चालखुरे याला ब्रह्मपुरीतील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. आरोपी दूरवरचे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करणे आवश्यक होते. पण आरोपीना सुचनापत्र देऊन सोडविण्यात आले. यावरुन या प्रकरणातील कारवाईची प्रक्रीया बदलविण्याचा प्रकार पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)