शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

खरिपाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची विक्री

By admin | Updated: June 7, 2017 00:46 IST

सध्या खरिप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकरी मशागत व बियाणे खरेदीच्या कामात व्यस्त आहेत.

कृषी विभागाने लक्ष द्यावे : शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या खरिप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकरी मशागत व बियाणे खरेदीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र याचा फयदा घेत काही व्यापारी व दलालांनी अनाधिकृतपणे कृषी विभागाकडून कसलीही मान्यता नसताना सर्रास शेतकऱ्यांना तेलंगणा, आंधप्रदेश, गुजरात राज्यातील बोगस बियाणे शेतकऱ्यांना दुप्पट किंमतीने विकत असल्याचा प्रकार सीमावर्ती भागात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लुट व फसवणूक होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. शासनाने काही कंपन्यांच्या बियाण्यांवर बंदी घातली आहे. मात्र जिवती, कोरपना तालुक्यात काही व्यापारी व दलालांनी ‘चोर बिटी’ या नावाची बियाणे अवैधरित्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेतकऱ्यांकडून दरवर्षी बिटी बियाण्यांची मोठी मागणी असते. मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नाही. परिणामी बियाण्यांचा काळाबाजार होवून शेतकरी भरडले जातात. शिवाय परराज्यातून देखील बियाणे आणून त्याची दुकानदाराकडून जादा दराने विक्री केली जाते. या बियाण्यांबद्दल लोकांमध्ये आमिष दाखवून गवत उगवत नाही, मजुरांचा खर्च वाचतो, तणनाशक असल्यामुळे उत्पादनात वाढ होते, एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पन्न मिळते, असे पटवून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री सुरू आहे. बिटी बियाणे घेण्याचा शेतकऱ्यांचा कल असल्यामुळे फसवणूक होवून शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. ‘राशी ६५९’ कापसाच्या बियाणांवर शासनाने बंदी घातली असून या वाणात उगवण क्षमता कमी आहे. दुकानांची तपासणी करण्याची मागणी शेतकऱ्यांची दिशाभूल होवू नये, यासाठी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बोगस बियाणे काळाबाजारावर अंकुश लावणे गरजेचे आहे. जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट असताना कृषी विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. जिवती व कोरपना, राजुरा तालुक्यात बहुतांश शेतकरी कपाशीचे उत्पन्न घेतात. मात्र अवैधरित्या सावकारी करणाऱ्या काही स्वयंघोषित सावकारांनी आतापासूनच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायला सुरुवात केली आहे. वरोरा, भद्रावती, चिमूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कापूस व धानाची शेती केली जाते. त्यामुळे धान व कापूस बियाणे खरेदीवर शेतकऱ्यांचा भर दिसून येतो.