शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने दिलेल्या लोखंडी बंड्यांची भंगारात विक्री

By admin | Updated: September 4, 2015 00:53 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या बंड्या शासनाने शेतकऱ्यांना वाटप केल्या.

बंडीचा दर्जा निकृष्ट : एक वर्ष वापरल्यानंतर निरूपयोगी बी. यू. बोर्डेवार  राजुराचंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या बंड्या शासनाने शेतकऱ्यांना वाटप केल्या. मात्र या बंड्या अतिशय निकृष्ट असल्याने शेतकरी त्या २० रुपये किलोने भंगारात विकत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राजुरा येथील सास्ती रोडवरील एका भंगारा दुकानदाराने शेतकऱ्याच्या बंड्या २० रुपये किलोने विकत घेतल्या. १६ हजार रुपयांची लोखंडाची बंडी ३ हजार ५०० रुपयाला भंगारात विकल्या जात असल्याने शासनाचा मूळ उद्देशच मातीमोल होत आहे.शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना शेतीचे साहित्य म्हणून लोखंडी बंड्या वाटप केल्या जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरवठा केलेल्या बंड्याचे वजन २४० किलो असायला पाहिजे. परंतु राजुरा येथील जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी बंड्या निकृष्ट असून वजन कमी असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरुन चंद्रपूर जिल्हा कृषी अधिकारी ए. पी. रणदिवे, कृषी अधिकारी एम. डी. डाखरे यांच्या उपस्थितीत जय भवानी इंजिनिअरिंग वर्क्स राजुरा येथे बंडी मोजण्यात आली. चक्क २५ किलो बंडीचे वजन कमी निघाले.राजुरा तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना शेती उपयोगासाठी बंड्या वितरित केल्या. परंतु या बंड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले. मागील वर्षी याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर पुढच्या वर्षी चांगल्या बंड्या पुरविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र यावर्षीही कमी वजनाच्याच बंड्या शेतकऱ्यांना पुरविण्यात आल्या आहे. शेतकरी एखादे वर्ष बंड्या वापरुन नंतर राजुरा येथे आणून त्यांची भंगारात २० रुपये दराने विक्री करीत आहेत.शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पाईपमध्येसुद्धा घोळ असल्याची शंका जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी त्यांच्या समक्ष बंडी मोजल्यामुळे राजुरा कृषी विभागात खळबळ उडाली आहे.महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या योजनेबाबत सतर्क नसून शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे योजनाचा उद्देशच फलित होताना दिसत नाही.