शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या हाताने केली जाते दारू विक्री

By admin | Updated: April 30, 2017 00:37 IST

जिल्हा दारूबंदी होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण कायदा व अंमलबाजवणी करणारेच सुस्त असल्याने याचा समाजात मोठा वाईट परिणाम पाहावयास मिळत आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : निष्पाप बालके होताहेत सराईत गुन्हेगारवरोरा : जिल्हा दारूबंदी होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण कायदा व अंमलबाजवणी करणारेच सुस्त असल्याने याचा समाजात मोठा वाईट परिणाम पाहावयास मिळत आहे. ‘गरिबीच्या आड वाढतंय दारू विक्रीच झाड’ अशीच काहिशी परिस्थिती सध्या शहरात पहावयास मिळत आहे. दारू विक्री करणाऱ्यांनी शक्कल लढवित बालकांच्या मदतीने शहरात दारूविक्री सुरु केली आहे.शहरातील आठवडी बाजारात सकाळला व सायंकाळी दारू विक्री करणाऱ्या बालकांचा मेळा भरतो. भाजीपाला विकावा तशी दारू विक्री केली जाते तर येणाऱ्या-जाणाऱा व्यक्तींना ैै‘ओ काका कोणती पाहिजे’ असा आवाज आल्यास तो दुसऱ्या कशाचा नाही तर तुम्हाला दारू कोणती पाहिजे हे विचारणारा आवाज असतो. आवाज ऐकून आपण थबकला तर लाल पाहिजे का पांढरी असाही सूर त्यांच्या मुखातून ऐकायला मिळते.शहरात खुलेआम दारू विक्री हा नवीन विषय नाही. शहरातील विविध चौकात दररोज दारू विक्रेत्यांचा मेळा भरत असतो. हम यहा के सिकंदर म्हणत काही दारू विक्रेते कुणालाही न जुमानता खुलेआम दारू विक्री करीत असतात. या अवैध दारू विक्री आणि तस्करीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल महिन्याला होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात पोलिसांचे हात ओले होत असल्याची खमंग चर्चाही शहरात सुरु आहे. दारू विक्रेते आणि तस्कर अवैध्य दारूच्या व्यवसायात व्यस्त असून पोलीस सुस्त असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. किरकोळ विक्री करणारे व एखादी दारूची बाटली असणाऱ्या व्यक्तींवर केसेस करून आम्ही दारूच्या केसेस करण्यात सर्वात समोर असल्याचा दिखावा येथील अधिकारी वरिष्ठांसमोर करीत असल्याचे दिसत आहे. पण शहरात मोठ्या प्रमाणात सुरु असणाऱ्या दारू विक्रीचे काय? असा सवालही आता नागरिक करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसाआगोदर दारू विक्री करणाऱ्या महिलेकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. हा घडलेला प्रकारही वरोरा पोलिसांनी अवैध्य दारू विक्रीसाठी केलेल्या नवीन नियमाच्या विरोधात होता, अशीही चर्चा शहरात सुरु आहे. जे वय शिक्षण घ्यायचे आहे, ज्या वयात त्यांना खेळायचे आहे, त्या वयात गुन्हेगारीकडे वाढणारे हे हात भविष्यात सराईत गुन्हेगाराचे ठरल्यास नवल वाटू नये. या प्रकाराला आताच आळा घातला नाही तर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढणार यात शंका नाही. (शहर प्रतिनिधी)वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज शहरात सुरु असणाऱ्या दारू विक्रीकडे स्थानिक पोलीस डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शहरातील अवैध दारू विक्री वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी स्पेशल स्काड वरोरा शहरात पाठवावा व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.