शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

फोटो गोंडपिपरी : येथील नगर पंचायतअंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगार ५ फेब्रुवारी २०२१ ला प्रलंबित आणि थकीत वेतनाचा मुद्दा ...

फोटो

गोंडपिपरी : येथील नगर पंचायतअंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगार ५ फेब्रुवारी २०२१ ला प्रलंबित आणि थकीत वेतनाचा मुद्दा घेऊन साखळी उपोषणाला बसले. प्रशासनाकडून कोणत्याच गोष्टीचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसताच उपोषण तीव्र करून मागण्या रेटून धरल्या. यासंदर्भात कामगारांवर अन्याय करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे लेखी आदेश सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी गोंडपिपरी नगर प्रशासनाला दिले. असे असतानाही सफाई कामगारांना अल्प वेतन देऊ केल्याने येथील सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शासनाच्या नियमावलीत कुशल कामगारांना १६ हजार रुपये तर अर्धकुशल कामगारांना १४ हजार रुपये इतर देय भत्ते मिळून महिन्याचे वेतन देण्याचे नमूद आहे. त्याचप्रमाणे महिन्यातून दोन रजा कामगाराच्या इच्छेनुसार घेता येईल, असा नियमदेखील शासनाने निर्गमित केला आहे. नगर पंचायत स्थापन झाल्यापासून कामगारांना मात्र १५० ते १७० रुपये रोजी देऊन राबविल्या जात असून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे. काम करणारे दुसरेच आणि भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची उचल करणारे दुसरेच, असा भोंगळ कारभार माहितीच्या अधिकारदरम्यान समोर आला आहे. बरेच वर्षांपासून कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा प्रकार जय भवानी कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा लेखाजोखा शासनदरबारी रेटून धरला आणि कामगारांच्या बाजूंनी मंजूरसुद्धा झाला.

बॉक्स

प्रशासनाने अंत पाहू नये

एक महिन्याचा कालावधी लोटला असूनदेखील नगर पंचायतकडून अद्याप कोणत्याच गोष्टीची पूर्तता करण्यात आली नाही. नगर प्रशासनाने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अन्यथा येत्या काही दिवसात तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशारा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूरज ठाकरे यांनी नगर प्रशासनाला दिला आहे.