शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

दीपोत्सवासाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शिथिलता दिली आहे. महाविदयालय, औदयोगिक आस्थापना, चित्रपटगृह व ॲम्युझमेंट पार्क, खेळाडूंच्या सरावासाठी मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात १७ लाख ५२ हजार ३३४ नागरिकांना डोस देण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वच निर्बंध हटविल्याने नागरिक आता जीवनाच्या सर्वच क्षेत्रात संचार करीत आहेत. मात्र, दिवाळीची खरेदी करताना बेफिकीरपणा केल्यास आरोग्यासाठी घातक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले असून दिवाळीतील गर्दी ही कोविड संक्रमणाला आमंत्रण ठरू नये, याची खबरदारी घेत आहेत. नागरिक व व्यावसायिकांनी गंभीरतेने प्रशासनाच्या सूचनांना गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी आहे.शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शिथिलता दिली आहे. महाविदयालय, औदयोगिक आस्थापना, चित्रपटगृह व ॲम्युझमेंट पार्क, खेळाडूंच्या सरावासाठी मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात १७ लाख ५२ हजार ३३४ नागरिकांना डोस देण्यात आले. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य  यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच दिवाळी        सणासुदीची खरेदी करावी, असे आवाहन केले.  

 वाहनांची आगाऊ नोंदणीकेंद्र सरकारने नवीन वाहनांच्या विम्याबाबतचे नियम बदलल्याने विक्री  घटली होती. दिवाळी दरम्यान चित्र बदलण्याचा अंदाज आहे. अनेकांनी दुचाकी, चारचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी केली. रिअल इस्टेटमधील मरगळ अजूनही दूर झाली नाही. त्यामुळे या क्षेत्रात उदासिनता आहे.

इलेक्ट्रॉनिक्सचे स्मार्टनेसदिवाळीसाठी चंद्रपुरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन इलेक्ट्रॉनिक्स माल खरेदी केला. या बाजारात थोडी तेजी दिसून येत आहे. एसी, स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन विकत घेण्याकडे लोकांचा कल दिसून आला. ग्राहकांना खेचून घेण्यासाठी दुकानदारांनी अनेक सवलती देण्याची तयारी चालविली आहे.  कोरोना संसर्ग कमी झाल्याचे पाहून कर्जपुरवठा कंपन्याही सरसावल्या. सध्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दी नसली तरी दुकानदार नवीन माल भरत आहेत.

बाजारात वाढली गुंतवणूककापड बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, ऑटोमोबाइल, सराफा, फर्निचर क्षेत्रांत व्यावसायिकांनी गुंतवणूक केली. सराफा बाजारातही सध्या चैतन्य दिसून येत आहे. कापड बाजारातही नवीन माल उपलब्ध झाला. ऑनलाईन खरेदीकडे कल असला तरी यंदा कापड बाजारात चांगला व्यवसाय होऊ शकतो. या आठवड्याच्या अखेरीस गर्दीसाठी मोठी गर्दी होऊ शकते.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Marketबाजार