शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

ग्रामीण रस्ते डांबरीकरणाविना

By admin | Updated: October 28, 2016 00:41 IST

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते.

प्रशासनाची उदासीनता : दुरुस्तीची कामे होत नसल्याने जातोय अनेकांचा बळी चंद्रपूर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हा वार्षिक अहवालातून समोर आले आहे. या वर्षीच्या पावसाने तर शहरती तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्तीचे काम केली जात नसल्याने अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार ग्रामीण रस्त्यांची एकुण लांबी ४ हजार ९४९.९० किलोमीटर आहे. यापैकी तब्बल २ हजार १०९.१६ किलोमीटरचे ग्रामीण रस्ते खडीकरणाचे आहेत. मातीच्या रस्त्यांची लांबी ३०१.१६ किलोमीटर असून डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची एकुण लांबी २ हजार ५३९.५८ किलोमीटर एवढी दर्शविण्यात आली आहे. ग्रामीण भागाचा विकास हा त्या भागातील रस्त्यांच्या स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे दळणवळणासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे आजही अनेक गावातील रस्त्यांची स्थिती सुधारली नसून वाट खडतरच आहे. त्यामुळे या रस्त्यांवर अनेक अपघात घडून नागरिकांचा बळी जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम करण्याची शासनाची योजना आहे. ग्रामीण रस्ते तालुका व जिल्हा मार्गाला जोडणे अपेक्षीत आहे. यासाठी जिल्ह्याला करोडो रूपयाचा निधी दरवर्षी दिला जातो. मात्र प्रशासनातील उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील रस्ते जैसे थे असून, ज्या रस्त्यांची दुरूस्ती आवश्यक नाही, अशा रस्त्यांवर निधी खर्च केला जात, असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे शहरी भागातील अनेक रस्त्यांची वर्षातून दोनदा दुरूस्ती होते, तर ग्रामीण भागातील रस्त्यांकडे लक्षच दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात जिल्हा मार्ग म्हणून डांबरीकरण झालेले १ हजार २००.०५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. तर ग्रामीण मार्ग म्हणून १ हजार ३३९.५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. तसेच तब्बल १ हजार ६४९.७६ किलोमीटर लांबीचे खडीकरणाचे रस्ते अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)