शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

ग्रामीण रस्त्याच्या नूतनीकरणाचा धडक कार्यक्रम

By admin | Updated: June 27, 2016 01:22 IST

विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी वर्षभरात २७२ कोटीचंद्रपूर : विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळेच गेल्या केवळ एकाच वर्षात २७२ कोटी रुपये जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी देण्यात आले आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण, मजबुतीकरणासाठी पैशाची कमतरता भासणार नाही, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.मूल तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या हस्ते पूल तथा रस्त्यांचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हा परिषद सदस्या वर्षा परचाके, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल यांच्यासह त्या त्या गावचे सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागील चार वर्षात जिल्हयातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या केवळ एका वर्षात २७२ कोटी रुपये रस्त्यांसाठी देण्यात आले आहेत. ग्रामीण रस्ते पक्क्या रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व रस्ते पूर्ण होतील. यासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे ते म्हणाले. रस्ते व विकासाच्या अन्य बाबतीत मूल तालुका मागे राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत बल्लारपूर मतदारसंघ हागणदारीमुक्त करण्याचे आश्वासन मी दिले आहे. हा मतदारसंघ देशातील पहिला हागणदारी मुक्त मतदारसंघ ठरणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या विश्वासावरच हे आश्वासन मी दिले आहे. यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून हागणदारी मुक्तीसाठी गावांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.ही कामे होणारपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध रस्ते व पुलांमध्ये नागपूर-मुल-खेडी-गोंडपिपरी येथील मार्गावरील गांगलवाडी जवळील एक कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या पुलाचा समावेश आहे. बोरचांदली येथील मूल-चामोर्शी रस्त्याची तीन कोटी रुपये खर्च करुन सुधारणा करणे, मूल-मारोडा-सोमनाथ रस्त्याचे एक कोटी रुपये खर्च करुन रुंदीकरण व डांबरीकरण, पेटगांव-घाटुर्नी-मारोडा-मुल-भेजगांव रस्त्याच्या नदीवरील १० कोटी रुपये खर्चाचा मोठा पुल, सुशी ते उथळपेठ रस्त्याचे ५० लक्ष रुपये खर्चाचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कोळसा-झरी-पिंपळखुट-नंदगुर-अजयपूर-केळझर-चिरोली-ताडाली रस्त्याचे १ कोटी ९० लाख रुपये खर्चांचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांचा समावेश आहे.