शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

गवराळा क्षेत्र’ देऊ शकतो पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:55 IST

भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने द्यावा ५ कोटींचा निधी, नगर परिषदेकडून पाठपुरावा सुरू

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील ऐतिहासिक गवराळा पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवू शकतो.भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. निसर्गाचे वरदान, रमणीय परिसर, आजुबाजुला टेकड्या, सभोवताली आमराई, बाजुलाच १० एकर परिसर असलेला गवराळा तलाव असे सौंदर्य या मंदिराला लाभले आहे. नगरपरिषदद्वारे हा खासगी तलाव विकत घेवून सौंदर्यीकरणाच प्रयत्न सुरू आहे.सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर तलाव न.प. ने विकत घेतल्यास तसेच यासाठी शासनाकडून ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास चांगले पर्यटन स्थळ अस्तित्वात येवू शकते. तलावात बोटींग, तलाव खोलीकरण, सभोवताल दिवे, तलावाभोवती फिरण्यासाठी मार्ग तयार करण्याचा न. प. चा मानस आहे. यातून परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो. एका उत्तरभिमुख असलेल्या या मंदिरात ६ फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक हे मंदिर आहे.भद्रावती शहरात पर्यटनाची मांदियाळीभद्रावती परिसरात बरीच पर्यटनस्थळे आहेत. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग तालुक्यात येतो. भद्रावती ते ताडोबा सरळ मार्ग झाल्यास भद्रावती येथे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. जगप्रसिद्ध विजासण लेणी, जैन मंदिर, गोंडराजाचा किल्ला, नाग मंदिर, भवानीमाता मंदिर, पुरातन डोलारा तलाव पर्यटकांचे आकर्षणस्थळ आहे. चांदा ते बांदा योजनेतंर्गत सुधारणा केल्यास तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येऊ शकते.गृत्स्यमदाची तपश्चर्याएका उत्तरभिमुख असलेल्या गवराळा येथील मंदिरात सहा फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक. गृत्स्यमदाने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या केली. तेथे वर प्राप्त झाले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर वरदविनायकाची स्थापना झाली. समोर उत्तरमुखी हनुमान मंदिर व बाजुलाच मोठे स्वयंपाकगृह आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

टॅग्स :tourismपर्यटन